Sunday, April 13, 2008

अ ब क ड


तु बोललीस कि,
"तू एक निरर्थक चित्रकार आहेस"
मी म्हटलं असणारचं-
कारण,
मी को-रा पानावर शब्द लिहीत होतो.
काल तु बोललीस कि,
"तू एक निर्थथक कवी आहेस"
मी बोललो 'हो'
"हो मि एक निरर्थक कवी आहे"
कारण,
मी अ ब क ड लिहायला शिकत होतो.
आज तु बोलतेस कि,
तूला तर अ ब क ड सुध्दा लिहीता येत नाही.
मी म्हटलं कालचं तु त्या शब्दांना
"निरर्थक" बोललीस ना मं?

2 comments:

Asha Joglekar said...

तुमच्या कविता तर छान आहेतच पण चित्र तर अप्रतिम आहेत.

phondekar.kalpesh said...
This comment has been removed by the author.