Tuesday, April 22, 2008

'एका स्त्रीला'


दर दिवशी तुझी वाट
पहाता पहाता दिवसाची
रात्र होते...
अन अचानक रात्री लोकांची
भिड जमा होते मला
पहायला...
चंद्र उगवल्यासारखा
दारावर येतोस रात्रीचा आणि
सकाळ झाली कि,
कुठेतरी हरवून जातोस ह्या शहरात.
आणि मी
विचार करते बसते
एका स्त्रीला आई होणं
किती सोप असत ना?

1 comment:

मोरपीस said...

सत्याचे भान करून देणारी कविता तुम्ही लिहिलेली आहे.