Tuesday, March 18, 2008

रात्र ही जागत राहते


रात्र ही जागत राहते
लावूनी दुर दिवे;
मज रात्र दिसत नाही
अंधाराचे हे कोडे.
ह्या अश्या अंधारात
उघडले दार आभाळाचे;
नाही दिसत कोणी
ठोके वाढतात काळजाचे.
दिसतो उजाडलेला अंधार
त्याचे वेगळेच सांगणे;
ह्या इथेच जाळशील
स्वतःला...आनंदाने.

पान्ह्याने भिजुन भिजुन...



सख्या,

तू असा मध्य रात्री उठून

पुन्हः हट्ट करायला लागलास...

मला पावसात भिजवण्याचा हट्ट

सोड आता...

काही वेळा पुर्वीचं तु मला

भिजवून झोपलेलास नं गाढ?

अता मी खुप थकली आहे रे...

पान्ह्याने भिजुन भिजुन...

Saturday, March 15, 2008

अप्सरा दिसतेस....


पावसात भिजुन तु आणखीन
सुंदर दिसतेस;
माझ्या डोळ्यांना तु मात्र पुन्हः
शिक्षा करतेस;
का नको पाहू तुझ्याकडे
वासनेच्या नजरेने?
भिजल्यावर तु खरी स्वर्गातली
अप्सरा दिसतेस.

Tuesday, March 4, 2008

जगायची होती इच्छा...


हा दाखऊन गेला, तो शिकऊन गेला...
जो भेटला मला तो, खोट बोलून का गेला?
सवाल होता एक गुंता सोडवायचा...
माझा सवाल गुंत्यात, अडकून का गेला?
कुणास दाखऊ एकट्या जिवाचा आकांत?
जो दिसला तो वेडा, मज हसुन का गेला?
केव्हाच आसवां सोबत गेली वाहुन स्वप्नं...
जेव्हा झालो जागा मी, सुर्य बुडून का गेला?
जगायची होती इच्छा अजुन काही क्षण...
जो श्वास थांबला; तोच मला मारुन का गेला?