Tuesday, January 29, 2008

झोंबतो हा गार वारा अंगाला...


झोंबतो हा गार वारा अंगाला
मिठीत घेणारा नाही कुणी भेटला,
किती,कशी,कुठे दर्वळू आणखी?
ह्या फुलाला जपणारा नाही कुणी दिसला,
हि कशी स्वप्न डोळ्यांत माझ्या सजली?
माझी स्वप्न पहाणारा नाही कुणी मिळाला,
अता कशी आवरु स्वतःला मि?
मला लाजवणारा नाही कुणी हसला.

Monday, January 28, 2008

शोधीत आपल्या सखीचे.



पहाते वाट कुणाची?
पाय वळती तळाशी
अंधारात घुमते एक
वाट पाहुन आशेची


घेऊनी पदरी दुःख
पहाते गुढ उदासी
नाही कोणी सांगाया
विचारु आज कोणासी?


रान रान भटकली
सांगत शब्द दुःखाचे
पाय हे नशेत वळती
शोधीत आपल्या सखीचे.

Saturday, January 26, 2008

घुंगरु विचारतात.......



घुंगरु विचारतात कुठे आहे

आज मैफिल सजलेली?

-तिच्या घुंगरुंना अता

सवय झाली आहे

वाह...वाह...ऐकायची!

कुठे आहेत माणसे नोटा

फेकणारी...?

कुठे आहे ति दारु जमिनीवर

सांडलेली...?

हे सारे प्रश्न घुंगरू विचारत

आहेत...एका तवायफला!

नं माणसे,न सजलेला कोठा,

नं सुर,नं ताल...काहीच

नाही समोर...

आकाशाकडे बघुन नाचणारी

ति एकटीचं होती...

Thursday, January 24, 2008

सावली निघाली....



पहाट झाली
रात्र झोपली
चंद्र उपाशी
पक्षी आकाशी


उन्हं तापली
वादळं सुटली
पाने गळाली
माणसे पळाली


सांज खुलली
वादळं थांबली
किरणं निजली
सावली दिसली


नाही म्हणाली
दृष्टी झोपली
वाट चुकली
सावली निघाली.

Tuesday, January 22, 2008

एक गोंडस बाळ ....



एक गोंडस बाळ

छान पसारा मांडून खेळत होतं...

सगळीकडे खेळणीचं खेळणी

पसरलेली...

कोणी एक व्यक्ती त्या

बाळा बरोबर खेळता खेळता

अजुन लहान झालं...

येणा-रा वादळाचं दुःख....



ति नेहमी प्रमाणे चालत चालतं

त्याच ठिकाणी येऊन पोहचली

समुद्रकिनारी...

खुप वेळ झाला ति ऊभी राहून

त्याची वाट पहात होती.

त्याच्या येणा-रा वाटेवर तिची

नजर होती....

बराचं वेळ झाला पणं तो काही

आलाचं नाही.

पाठ फ़िरवून परत ति

सुर्याकडे आणि समुद्राकडे

पहायला लागली...

त्यांच्याकडे पहाता पहाता हळू हळू

सुसाट वारा सुटला

असं वाटतं होतं कि,

तो सुटलेला वारा तिला

स्वतः बरोबर घेउन जाईल

तिच्या प्रियकराकडे.....

पणं असं काहीचं झाल नाही.

ति एकटीचं त्या सोसाट्याच्या वा-रात

उभी होती....फ़क्त एकटीच.

तिला येणा-रा वादळाचं दुःख आधीचं

कळलं होतं...

Thursday, January 17, 2008

एक निरर्थक कविता...



कधी कधी स्वतःशीच बोलताना

मनाला द्यावे लागतात पुरावे...

स्वतः जिवंत असल्याचे!

कधी खरे,कधी खोटे...

ख-रा पुराव्यांनी विचारलेल्या

प्रश्नांची उत्तर सहज मिळतात.

पणं कधी कधी...

खोट्या पुराव्यांनी बोललेल्या

शब्दांचा अर्थ गुंतत जातो...

ते बोललेले शब्दही खोटे वाटू

लागतात...

त्या शब्दांना मं परत

नव्याने परिचय द्यावा

लागतो स्वतःचा ...!

Tuesday, January 15, 2008

मि एक आकाशवेडी...



इवले इवले पंख माझे
उंच उंच नजर माझी
अपेक्षा नाही नव्या बळाची
दिशा शोधते एक उडण्याची...


झुकली नाही नजर माझी
तुटली नाही जिद्द माझी
स्वतःहुन उडू पहाणारी
मि एक आकाशवेडी....

तिघांच्या मृत्युचं कारण काय?



असचं एके दिवशी चित्र

काढताना एका को-रा पानाचा

मृत्यु झाला...

दर दिवशी एक वेगळा रंग भरायचो

त्या कागदावर...

एक दिवशी कंटाळून तो कागद

फ़ाडुन त्या कागदाचा मृत्यु केला मी..

ते तुकडे अजुनही माझ्याकडे आहेत तसेचं...

कधी त्यांच्याकडे बघीतलं

तर ते विचारतात मला...

आपल्या तिघांच्या मृत्युचं कारण काय?

Monday, January 14, 2008

दोन मैत्रीणींची कहाणी...





"धुरात मिळते आय़ुष्याची मजा


अन् श्वासात जगण्याची सजा"


_हे घे ओढ फक्त एकचं कश्त माझ्यासाठी...


आपल्या मैत्रीसाठी!


मैत्रीसाठी बोलतेस तर ठिक आहे


दे मला एक कश्त...


दर दिवशी एक कश्त एक कश्त


ओढत मैत्री आणि आयुष्यं कधी


संपल ते कळलचं नाही दोघींना...


अता दिसतो फक्त दुरुन धुर


आणि धुरातल्या आठवणीं...