Saturday, April 26, 2008

'परछाई'


उस बिघडी हुई दिवार तक नजर पहुचती है
एक पुरानी बात याद आती है मुझे...
कुछा साल पहले मै उसी दिवारपें कुछ
लिखां करता था...
तब वो मेरे बचपन के दिन थे.
आज वही दिवार रात मै देखता हु मै
तब ऐसा लगता है की,
उस दिवार की परछाई मुझे चिरती हुई
मेरे आरपार जा रही है.
और मै खुदकी ही एक परछाई को देखता रहेता हू.
आज बहोत दिनो बाद
पुरानें दिनों की याद दिल मै
उतर आयी है...
उस याद सें पिछा छुडाना अब
मुश्किल है.
एक बार ऐसी हलकीसी कोशिश
कि थी मैने...
लेकिन नाकाम रहा.
उस कोशिश की एक
परछाई अबतक दिल पर दिखती है.

'किनारा'


हर रोज जब किनारे को देखता हु
तब ऐसा लगता है कि,
उस सागर के पानीमें एक
कागज की नाव डुब रही है और
बहोत सारे मुसाफिरों कि
परछाई तैर रही है.
पता नही वो परछाई
कबतक तैरती रहेगी?

'परछाई'


कभी मेरी कभी तुम्हारी
रेंगती रहती है एक परछाई;
कभी इधरसें कभी उधरसे
नजदीक आती है एक परछाई;
कभी यहॉंसे कभी वहॉंसे
हसती रहती है एक परछाई;
कभी मुझे कभी तुम्हे
देखती रहती है एक परछाई.

'पहाट नग्न दिसते'


असं म्हणतात कि,
रात्रभर समुद्रकिनारी बसलं ना कि,
"पहाट नग्न दिसते"
आणि मं हळूहळू ति
किरणांच्या चादरीत स्वतःला
झाकुन ठेवते.
पुन्हा रात्र झाली कि,
तिच चादर अदृश्य होते.
हे सर्व ऐकायला खुप चांगल वाटतयं ना?
तुझं काय रे...
डोळे मिटुन काहीही बोलू शकतोस.
कधी बघितलं आहेस का अश्या पहाटेला?
नग्न तर ति रात्रीचं होते.

Tuesday, April 22, 2008

'एका स्त्रीला'


दर दिवशी तुझी वाट
पहाता पहाता दिवसाची
रात्र होते...
अन अचानक रात्री लोकांची
भिड जमा होते मला
पहायला...
चंद्र उगवल्यासारखा
दारावर येतोस रात्रीचा आणि
सकाळ झाली कि,
कुठेतरी हरवून जातोस ह्या शहरात.
आणि मी
विचार करते बसते
एका स्त्रीला आई होणं
किती सोप असत ना?

Saturday, April 19, 2008

"काळोखाचा तळ"



हातात फडफडणारा दिवा घेऊन
अंधारात वाट शोधत असताना
समोरुन एक व्यक्ती सरळरेषेत
चालत येतेय असं दिसतं.
त्या व्यक्तीला शोधताना मात्र
काळोखाची विराट दार आतुन
बंदच आहेत...
आता सरळरेषेत चालत येणारी
व्यक्तीचं पाहू शकते.
अंधाराच्या आत डोकावून
आत कोण आहे ते?

Friday, April 18, 2008

"पक्ष्याशी बोलताना"


कालचं एका पक्ष्याशी बोलताना
मनातुन काही शब्द आले.
चल ये...
"उडून दाखव मला"
"घे उंच उंच भरा-रा"
"हे आभाळ तुझचं आहे"
पणं,मी विसरलोचं होतो
परवाचं मी त्या पक्ष्याचे पंख
छाटून टाकले होते.
अता तो पक्षी निमुटपणे खिडकीतुन
पसरलेल्या आभाळाकडे व माझ्याकडे
पहात असतो.
त्याच्या प्रश्नाचं उत्तर मला कधीचं सापडणारं नाही!
पण, त्याच्या मनातुन निघालेली "हाय"
मला नेहमीचं लागतं राहणारं.

Sunday, April 13, 2008

अ ब क ड


तु बोललीस कि,
"तू एक निरर्थक चित्रकार आहेस"
मी म्हटलं असणारचं-
कारण,
मी को-रा पानावर शब्द लिहीत होतो.
काल तु बोललीस कि,
"तू एक निर्थथक कवी आहेस"
मी बोललो 'हो'
"हो मि एक निरर्थक कवी आहे"
कारण,
मी अ ब क ड लिहायला शिकत होतो.
आज तु बोलतेस कि,
तूला तर अ ब क ड सुध्दा लिहीता येत नाही.
मी म्हटलं कालचं तु त्या शब्दांना
"निरर्थक" बोललीस ना मं?

"चांदण्यांच चित्र"



आकाशातल्या ता-रांना जोडून
एकेदिवशी एक चित्र तयार केलं.
माझे ईतके मोठे हात नव्हते कि,
ते आभाळापर्यंत पोहोचले असते.
तरीसुध्दा,
पायांच्या अंगठ्य़ांवर उभं राहून
एक बिंदू दुस-रा बिंदूला जोडले.
माझ्या नजरेतुन एक सुंदर चित्र
तयार केलं...
लोकांनाही खुप खुप आवडलं.
तू मात्र बोलून गेलीस...
"तू एक निरर्थक चित्रकार आहेस"
माझा काय दोष?
तुच दिवसा बघीतलसं ते चित्र!
आता पुन्हा कधी आभाळाला
हात टेकतील...?
माहित नाही.

Saturday, April 12, 2008

"आकृतीचं दिसते."



माझ्याकडची पान संपली

तेव्हां तु मला

भरपुर पान आणून दिली होतीस.

अन बोललीस कि,

हि घे पानं सारी!

पुन्हा माझं चित्र काढ...

पणं,मी काय करु?

तुझं चित्र काढायला जाते तेव्हां

आरश्यात मला अस्पष्ट

आकृतीचं दिसते.

"काळीज"



रक्त आटले
भरुन काठोकाठ माठ;
आभाळ झुकते
खाली वाकुन पाठ.


कशी चढणार
तिथे काळजाचे घाट;
काळोख चुंबिते
प्रकाशाची एक लाट.


बघुन घे
अंधाराचे हे थाट;
वेदना तुझ्या
जखमांना तुझ्या तू चाट.

Friday, April 11, 2008

"रिता गाभारा"

गाव भरले पाण्याने
नाव निघाली माघारा;
कसा दिसतो आतुन
उभा असलेला गाभारा.
हि वेळ मृत्यची
दाही दिशांना विचारा;
बासुरी वाजवतो
एकटा पहा बिचारा.
वाहता वाहता
भेटला असा पसारा;
कोण बघतोच आहे
रक्तात बुडलेला किनारा.

"गर्भ"



कोण्या गर्भात वाढे
विश्व एका तान्हुलीचे;
डोळ्यांत स्वप्न सजते
एका येण्या-रा छकुलीचे.


रात्र अशी भरतीची
उठून गर्भ चाळते;
हात ठेवून गर्भावर
आत अंधार पहाते.


बाळाला गर्भात ठेवून
का पाठीत वाकते;
कोण्या गर्भातुन
विश्व सोनूलीचे उठते.

Thursday, April 10, 2008

'जळेल एक विधवा'


मोडक्या घरात
मरते एक वेष्या;
रात्र धावते
रात्रीला कोणीतरी थांबवा.
कोण लावेल
तेलाचा एक दिवा;
कोण जागेल
तिला एकदाशी पोचवा.
उठा मुर्दाडांनो
स्त्रीसाठी एवढसं करा;
नाहीतर एका साडीवर
जळेल एक विधवा.

'एका सावलीला जाळते'



रान रान तुडवते
पावलांची चाहूल नाकळे;
हिरव्या गर्द रानात
दृष्टी दिशा आंधळे.


भर मध्यानीची वेळ
डोळ्यांना जखमा देते;
हिरव्या काट्यांना पानांना
काळजाने न्हाते-धुते.


भिजुन रात्र धावते
थकुन पुन्हा हसते;
कोण आग लावून
एका सावलीला जाळते.

Wednesday, April 9, 2008

"तुझ्या स्तनांना"



रात रात जागुन
का ठेवतेस पहारा;
फाटक्या पदराने
किती घालतेस वारा.


हि वेळ निद्रेची
का शोधतेस चारा;
बाळ रडतं कुशीत
हातांना नाही थारा.


कशी लाचार तू
नाही तुला किनारा;
कोण बघतेयं दुरुन
उघड्या तुझ्या स्तनांना.

Tuesday, April 8, 2008

"वनवासी"

एका अनोळखी गावात
येते दुरुन चाहूल;
कोण डोकावून पहाते
टाकते हळूचं पाऊल.
ति संध्याची किरणं
घेते ओढून पांघरुण;
ओसाड गावच्या दारी
कोण घालतेयं अंथरूण.
ईथे-तिथे पाहून
नाही हलत काळोख;
कोण कुठला वनवासी
एकटा ठेवतो पाळत.

"स्त्री झाली सस्ती."


मध्यरात्री केला
रांडांनी आक्रोश;
नशिबाचं देणं
काळोखात जल्लोश.
नावाजलेल्या वेष्यांची
जुनी-पुरानी वस्ती;
पुरुष येतात ढोसुन
स्त्री झाली सस्ती.
कुठला हा जन्म
स्त्री झाली वेष्या;
रांड म्हणून जगशिल
"पुरुष" म्हणण्यापेक्षा.

"मुर्ति"



घर सजवता सजवता

घराच्या ग्रहप्रवेशासाठी

फुलं घेवून येते

असं बोलून गेली...

काही वेळाने दबक्या

पावलांनी

ति घराकडे आली.

तेंव्हा पासुन मी माझ्या

घरात एक नग्न मुर्ति

फुलांनी सजवून ठेवली आहे!

Sunday, April 6, 2008

"वेष्यांच्या वरातीत"

वेष्यांच्या वरातीत
पुरुषांचा नाच;
हिजडे नाचणारचं
त्यात कसली लाज.


पुरुषाची जात
त्याचे वेगळेचं हात;
करुन पापं पुन्हा
हिजडे दाखवणारं दात.


कसले हे पुरुष
ज्यांना नाही कात;
रात रात जागुन
शेवटी स्त्रीयांनाच खात.

Saturday, April 5, 2008

"वासना"



तिच्या कुवार अंगाला
पिवळा गर्द रंग;
येते हाक दुरुन
राह नको अशी मग्न.


अंग तुझे हळदीचे
त्याला वेगळाच गंध;
कोण बघतयं तुला
वासनेने,उभी तंग.


हि वेळ व्यथेची
करेल तुला नग्न;
कोणी एक येउन
फाडेल तुझे अंग.

"हे राम हे राम"


दिवसा स्वतःला "साधु" समजतो
रात्रीचा मात्र वेष्येसोबत झोपतो
सिगरेट,दारु,अफिमची नशा करतो
लोकांना मात्र पुण्याचा मार्ग दाखवतो
दिवसा राम राम बोलतो
रात्र झाली कि रांड रांड शोधतो
रांडेला रात्रीचा रडवतो अन्,
पुन्हा पहाटे हे राम हे राम बोलतो

"मधुमेह"



एकदा म्हणतो मला साखर द्या
पुन्हा बोलतो मला खाऊ द्या
का विचारतो प्रश्न असे स्वतःला
वेळ सांगते तु मारुन खा.दुस-राला


घे जगुन तू,दिल्ली अजुन दुर
घे चाखुन तू,विष गोड खुप
नको अडवू स्वतःच्या हाताला तू
मधुमेह म्हणतो मरत मरत जगू

Thursday, April 3, 2008

**आई**



रात्रीच्या कुशीत निजताना
आईची आठवण येते;
पापण्या बंद करताचं
पाण्याला जाग येते.


हातावर डोक ठेवताना
ओठांवर अंगाई येते;
बाळा जो जो बोलताचं
हळूच गायी गायी येते.


रात्र हि सरताना
काळजाची वात होते;
आईची आठवण येताचं
डोळ्यांना जाग येते.

Wednesday, April 2, 2008

उध्वस्त किनारा.


या उध्वस्त किना-रावर
सगळीकडे माझ्या पावलांचे ठ्से
वाळूत अडकुन पडले आहेत
आता त्यांना मुक्त करायचयं
पणं इतका वेळ कुठे आहे?
सागराला भरती येतेय...

प्रकाशआंधळा....




हा सुर्य प्रकाशआंधळा
बांधतो जगाला किरणांच्या काचा
तुटतो उन्हात आकाशाचा पान्हा.


पहात बसतो दिसणारा अंधार
दडतो पुन्हा काळोखाच्या आत
हसुन पहातो दिवसाला न्हात.

Tuesday, April 1, 2008

अब्रु तिची लुटलेली.


असा हा चि-राचि-रांचा
अस्वस्थ उभा वाडा;
कुठून आली ही पाखरे
फिरुनी गाव-पाडा.


ति कसली आकृती दिसे
आरश्यात तुटलेली;
शोधीत फिरते एकटी
अब्रु तिची लुटलेली.


हे शब्द तिचे
वेगळेच वनवासी;
शोधते त्यांना घेउन ति
हृदयात गुढ उदासी.

चढणीचा घाट.



पुन्हा चढणीचा घाट
ह्याला अंत नाही;
थोडे थकलेत पाय
वासरु थांबत नाही.


कुठले ते गाव
ज्याला नाव नाही;
हि वेगळीचं वळण
तिथे कोणीच नाही.


लपतात ते ठसे
ज्यांना वाट नाही;
ते लपुन हसतात
वासरु थांबत नाही.