Friday, November 16, 2007

तिला समुद्राच्या दुःची जाणिव होत होती...



ति नेहमी प्रमाणे त्याची वाट

पहायला त्याच ठिकाणी गेली...

ति एकटीच एकाकी दुर उभी

राहून त्याची वाट पहात होती...

एकटक त्या सुर्याकडे अशी

अशी पहात होती की...

तिला त्या सुर्याला काहीतरी

विचारायचं आहे...!

पणं उत्तर कोण देणार...?

समुद्राच्या लाटाही शांत शांत

खुप वेळ झाला...

अजुन हा आला नाही...

अजुन हा आला नाही...?

असा विचार करत करत

ति समुद्राच्या ओल्या वाळूवर

लाटांकडे पहात बसली...

सुर्य कधी बुडून गेला

हे तिला कळलचं नाही...!

ति एकटक त्या लाटांकडे

पहात होती...बसुन.

तिला समुद्राच्या दुःखाची

जाणिव होत होती...

(कल्पेश फोंडेकर)

Monday, November 12, 2007

हे तिला कळतं नव्हतं....



ति परत त्याची वाट पहात उभी होती...!

गेलेले क्षण आठवतं होती...

तिच्या प्रत्येक अश्रुमध्ये त्याची

प्रतिमा होती...

तिच्या प्रत्येक हाकेत

त्याची दिशा होती...

सुर्याकडे तिच बघणं थांबत नव्हतं.

सांज होत आली...त्याची वाट

पहाता पहाता...

पणं तो काही दिसतं नव्हता.

सुर्य बुडून गेला...ति अशीच उभी तिथे!

सारखं घड्याळाकडे पहायची....एकटक!

सुर्य बूडून गेला होता कधीचं...

घड्याळही चालत होतं...पणं

तिचे गळणारे अश्रु थांबले होते...

हे तिला कळतं नव्हतं.

(कल्पेश फोंडेकर)

Saturday, November 10, 2007

पैश्याकडून श्वास...



पैश्यामध्ये माझे मनं होते गुंतलेले
पैश्याचे नि माझे नाते होते जुळलेले...!


पैसा होता एकेकाळी माझा गुलाम
पैश्याने माझे हात होते धुतलेले...!


पैश्यावर गाजवले र्वचस्व मि नेहमीचं
पैश्याने दिले मला ते क्षण होते रडलेले...!


एक वेळ आली अशी जिवनात माझ्या
पैश्याकडून श्वास मिळाले होते हरलेले...!

(कल्पेश फोंडेकर)