Sunday, August 24, 2008

"सीक्वेन्स"



माझे आयुष्यं तसे एका रमीच्या डावासारखं आहे,
जिवनातली तेरा बर्षेःजशी तेरा पानं वाटलेली स्वतःहून स्वतःला;
उरली फक्त एकेचाळीस वर्षेःएकेचाळीस पानांसारखी,खाली राहिलेली
त्यातही दोन जोकर आहेतच कुठेतरी पत्यांमध्ये लपलेले.


एखादं पानं उचलून जुळवावं म्हटलं तरं...
नेमकं तेचं उचललेलं पान दगा देऊन जात समोरून,
जसं आयुष्यातं एक वर्ष रडवून जातं ना तसचं काहितरी
परत पुन्हा वाट बघत राहतात हातातली तेरा पानं...पुढल्या पानाची.


खुप त्वेष येतो,जेव्हां उचललेलं एक एक पान जुळत नाही
ती वेळचं तशी असते...जसं एखादं वर्ष आयुष्याशी जुळत नाही,
जेंव्हा खाली राहिलेली पानं हातातल्या पानांशी जुळत नाहीत...
त्यावेळी वाट पहावी लागते एका जोकरची...भेटेलचं कधीतरी तो.


मी वाट बघतोय केव्हांपासुन सीक्वेन्स जुळायची,
फारचं क्वचित जुळतात सीक्वेन्स हे मला माहित आहे;
कधीपासुन अडून बसलोय एका पानासाठी(उदाःबदाम राणी)
कधीतरी अचानक भेटेल ती आणी सीक्वेन्स पुर्ण होईलचं.

Friday, August 22, 2008

"तिचं आभाळभर दुःख"


दार अर्धे लोटलेले दिसलेः
दाराआड लपलेली तु; स्वतःला लपवत,अंधाराच्या पलिकडे
तू अवचित समोर येतेस, नग्नावस्थेत असून...
तेंव्हा तुझी अवस्था पाहुन कोणाला तरी जाग येते.
तुझ्या स्तनांवरुन खाली आलेल्या मोकळ्या कुंतला,
अन तसे तुझे दोन्ही हात योनीला झाकलेले;
तरिही, स्वतःला झाकण्याच्या पुर्ण प्रयत्नात...तिरकस उभी तू
कुशिवर असलेल्या लाल भडक खुणा मला दिसणारचं.
थांब...थांब...अशी एकाएकी पाठ नको दाखवू मला
तुझे नितंब झाकण्यासाठी तुझ्याकडे काहीचं नाही आहे;
हे तुला माहित होत, तरीसुध्दा तू दार बंद करुन घेतलेस
तेंव्हा तिचं आभाळभर दःखं माझ्या डोळ्यांत मनात मावलं नाही.

"काठी"


नावेतुन उठता खाली
मागे राहिला गाव;
कोठे आलो आकळेना
माझी सुटली नाव.


पुढे सुक्या वाळूचे ढिग
नसो चलण्याला अंत;
पायाखाली आभाळाच्या सावल्या
कुठल्या दिसे जिवंत?


चालता चालता पाउलं
ढिल्या वाळूत रुतत जाते;
तेंव्हा, माझे थकलेले आयुष्यं
काठी टेकत चालते.

Friday, August 15, 2008

"नवा अर्थ"


अर्ध्या झोपेत आईच्या
बाळं रडण्याचा आवाज;
तशी तिला आली
थोडीशी झोपेत जाग.
तिच्या स्तनांना हळूचं
मऊ ओठांचा स्पर्श;
रात्रीच्या गूढ तंद्रित
आईच्या दुधाला नवा अर्थ...
बाळं निजून गेलं, अन्
हालली जराशी माय;
बाळाच्या ओठी आली
रात्रीच्या दुधाची साय.

'मैत्रीवर' चार ओळी


मैत्रीवर चार ओळी
खुप अर्थखोल;
तुझी माझी मैत्री
आहे अनमोल.
वर पसरलेले आकाश
त्याला टेकले हात
तुझी साथ होती म्हणून
केले प्रयत्न यथार्थ.
पुढे कोसळती काठ
त्यावर पडली पावलं;
तुझा हात धरुन
भरतीच्या लाटांना पाहिलं.
आले गर्भार चढण
तसा वळणावळणाचा घाट;
तुझा आधार असता
चढून गेलो दगडी वाट.
अशीच तु कायम
रहा माझ्या आसपास;
तु आणि तुझी मैत्री
आहे माझ्यासाठी खास.