Thursday, August 30, 2007

आज तहान भागवली...




पुन्हा त्या आठवणीने असे का रडविले आहे?
पुन्हा ते विसरलेले असे का आठविले आहे?


कुठेही दिसले नाहीत ते तुटलेले रेशीम धागे
कधीच कळले नाहीत ते गुंतलेले प्रेमाचे धागे


नको दाखवुस आता तु जगण्याची दिशा
तु ऐकतोस नेहमी माझ्या मरण्याची भाषा


जरी स्वप्नात माझ्या तु हसत आलास
तरी एकांतात तु मला नेहमी मारुन गेलास


अता कळले नाही मला हसायचे कुणासाठी
माझ्या एकांतात रडली होती फ़क्त तुझ्यासाठी


भरला नाही कधी दुःखाचा बाझार मी माझ्या
दाखविला नाही आसवांचा प्रवाह मी माझ्या


तुझी माझी जरी झाली वेगळी वाट केव्हाची,
तुझे स्वप्नात येणे पणं कुठे,रे,थांबले आहे?


आता मि तुला दुःखाचा पुरावा कुठुन दाखवु?
माझ्याच अश्रुंनी माझी आज तहान भागवली.


(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, August 21, 2007

संभाळतेस तु!




दिसलो नाही कधी येता जाता
दाराकडे पहातेस एकटक तु
गेलो कधी जवळुन तुझ्या
नजरेतुन हासतेस तु!



विसर आला जरी दिवस भरात
मला एकदातरी हाक मारतेस तु
एकटाच जिव माझा संभाळत
राहतेस मनाच्या कोपरयात तु!



मैत्री ही अशी अपुली मनात
रोज हवीहवीशी वाटते मला तु
मी कधी विसरलो जरी
'मैत्रीला' खरी संभाळणारी तु!


(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, August 14, 2007

कळे न मज अता...




कळे न मज अता, कोणत्या थेंबास आपलं मानू?
तो पाऊसही अता न भिजवे, आणि ते अश्रुही


कळे न मज अता, कुठल्या ताऱ्यास बघु?
काही दिसतात लपताना, काही मावळताना


कळे न मज अता, कोणावर विश्वास ठेवु?
परक्यांनी अश्रु दिले, आपल्यांनी धोके


कळे न मज अता, आयुष्याचे दिवस मोजु कुठले?
दोन गेले पळण्यात, दोन गेले लपण्यात


कळे न मज अता, कोणत्या वाटेस येतो बोलु?
एक जाते स्वर्गास, तर दुसरी जाते मरणात


कळे न मज अता, ह्या एकट्या जिवास कसा जाळु?
नाही मिळाली सुकी लाकडं, नाही रडणारी माणसं


(कल्पेश फोंडेकर)

Wednesday, August 8, 2007

हेही कळतं आहे....




हेही कळतं आहे
आयुष्यं एक प्रवाहच आहे


आयुष्यं आहे थांबलेल
तरी,वाट ही बोलवतेचं आहे


विसरायचे कसे मी
घडले ते एक सत्यच आहे


स्वप्ने सुंदर सजली
पणं,ती अजून सुनीच आहे


जगतो ज्या श्वासांवर मी
कर्जाच ते ही एक ओझच आहे.


(कल्पेश फोंडेकर)

Wednesday, August 1, 2007

गेलं वाहून आसवातं...




काय सांगुन फ़ायदा ह्या शरीराच्या यातना
या मनातल्या आठवणी कुठेच नाही जातना


त्या आठवणींत, जगण्याची काय मजा
ज्या आठवणींत मिळते, जळण्याची सजा


नको कऱुस आनंद, ह्या दोन दिवसांचा
त्या आनंदातही, असेल एक क्षण दुःखाचा


आयुष्यात जगशील, कधीतरी त्या सुखात
पणं हे मनं वेळोवेळी, रडवी तुला दुःखात


कोणास दाखवशील ही यातना आयुष्यातं?
ईथे तरं तुझं सारचं गेलं वाहून आसवातं...


(कल्पेश फ़ोंडेकर)