Sunday, September 23, 2007

हसण्यातले दुःख...




हसण्यातले दुःख 'मला' कळतं आहे!
हसताना मात्र मनं माझं रडतं आहे!


कसा शोधू मी एक एक किरण?
डोळ्यांवर अंधाराचे एक कवच आहे!


देणारयांचे उपकार कसे फेडू?
जिव श्वासांचा कितीसा उरला आहे!


सोडतो हे शरीर, त्याचे दुःख कैसे?
कुठला जिव ईथे अमर दिसतं आहे!


(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, September 11, 2007

अश्रु दाखवायला ...




भेटलेच तुला कधी स्वप्नात...
हसशील का परत बघून आनंदात पुन्हा?


जोडशील पुन्हा तुटलेले धागेही...
जोडल्या जागी गाठी राहतील का पुन्हा?


दिसला न तु प्रत्यक्ष।त मला...
म ह्या डोळ्यांना तुझी आस का पुन्हा?


तु वेळ जरा दे सावरायास मला...
मग करशील का रे परत बरबाद पुन्हा?


बांधुन वचनात माझ्या एकट्या जिवाला...
शपथा का घालतोस स्वतःच्या जिवाला पुन्हा?


आशेचे किरण होते मावळले...
म स्वप्नांचा हा छळवाद कशाला पुन्हा?


बघीतलेस कधी ह्या जिवाला जळताना...
अश्रु दाखवायला भेटशील का रे स्वप्नात पुन्हा?


(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, September 4, 2007

सत्य मी दाखऊ कसा?





तो मरणाचा क्षण मी टाळु कसा?
अन् येणारया मरणाला मी बघु कसा?


दिसत होते मरण डोळ्यांत जिवाचे
क्षणापुर्वीच्या मरणाला मी थांबवु कसा?


सारेच दिसत होते बाटलेले
त्या जमावाला एकत्र करु कसा?


दिसत होती लोकं सारी रडताना
त्या शवाला सत्य मी दाखऊ कसा?


(कल्पेश फोंडेकर)

Monday, September 3, 2007

मला काहीच आठवेना....



पहाटे पहाटे माझी निंद थोडी खुलली
तुझी रेशीम मिठी मात्र सैल होईना


मला न कळेना...तुला न कळेना...
तुझा पदर मात्र तुला न सावरेना


रात्र गेली सरुन एकमेकांच्या मिठीत
तरीही,तुझ्या ओठांची लाली मला पुरे पडेना


तु चाललीस निघुन दबक्या पावलांनी
पणं,तुझा हात माझ्या हातुन काही सुटेना


गडे..दिलेस लाख बहाणे मला रात्रीचे
तुझ्या ओठांचे शब्द मला काहीच आठवेना.


(कल्पेश फोंडेकर)

Thursday, August 30, 2007

आज तहान भागवली...




पुन्हा त्या आठवणीने असे का रडविले आहे?
पुन्हा ते विसरलेले असे का आठविले आहे?


कुठेही दिसले नाहीत ते तुटलेले रेशीम धागे
कधीच कळले नाहीत ते गुंतलेले प्रेमाचे धागे


नको दाखवुस आता तु जगण्याची दिशा
तु ऐकतोस नेहमी माझ्या मरण्याची भाषा


जरी स्वप्नात माझ्या तु हसत आलास
तरी एकांतात तु मला नेहमी मारुन गेलास


अता कळले नाही मला हसायचे कुणासाठी
माझ्या एकांतात रडली होती फ़क्त तुझ्यासाठी


भरला नाही कधी दुःखाचा बाझार मी माझ्या
दाखविला नाही आसवांचा प्रवाह मी माझ्या


तुझी माझी जरी झाली वेगळी वाट केव्हाची,
तुझे स्वप्नात येणे पणं कुठे,रे,थांबले आहे?


आता मि तुला दुःखाचा पुरावा कुठुन दाखवु?
माझ्याच अश्रुंनी माझी आज तहान भागवली.


(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, August 21, 2007

संभाळतेस तु!




दिसलो नाही कधी येता जाता
दाराकडे पहातेस एकटक तु
गेलो कधी जवळुन तुझ्या
नजरेतुन हासतेस तु!



विसर आला जरी दिवस भरात
मला एकदातरी हाक मारतेस तु
एकटाच जिव माझा संभाळत
राहतेस मनाच्या कोपरयात तु!



मैत्री ही अशी अपुली मनात
रोज हवीहवीशी वाटते मला तु
मी कधी विसरलो जरी
'मैत्रीला' खरी संभाळणारी तु!


(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, August 14, 2007

कळे न मज अता...




कळे न मज अता, कोणत्या थेंबास आपलं मानू?
तो पाऊसही अता न भिजवे, आणि ते अश्रुही


कळे न मज अता, कुठल्या ताऱ्यास बघु?
काही दिसतात लपताना, काही मावळताना


कळे न मज अता, कोणावर विश्वास ठेवु?
परक्यांनी अश्रु दिले, आपल्यांनी धोके


कळे न मज अता, आयुष्याचे दिवस मोजु कुठले?
दोन गेले पळण्यात, दोन गेले लपण्यात


कळे न मज अता, कोणत्या वाटेस येतो बोलु?
एक जाते स्वर्गास, तर दुसरी जाते मरणात


कळे न मज अता, ह्या एकट्या जिवास कसा जाळु?
नाही मिळाली सुकी लाकडं, नाही रडणारी माणसं


(कल्पेश फोंडेकर)