Monday, March 23, 2009

प्रखर शाप


जन्मानंतरची पहिली पाच सहा वर्षेः खेळाखेळात गेली,
लपाछपी, बाहुला-बाहुलींची लग्न, पत्यांचा बंगला, भातुकली ई.
नंतरची वर्षे नाते न जुळलेल्या अभ्यासात...जेमतेम मॅट्रिकची पायरी चढलो.
जिथे "कैद ए बामुशक्कद" ची सजा मिळाली.
:
:
काही वर्षांनंतर कविता भेटली; अधुनमधुन तिच्याशी बोलायचो,
तिला वाचायचो...एक दिवस अचानक झटका आला अन थेट तिला
कागदावर उतरवली; तेंव्हा पासुन एक प्रखर शाप मिळाला मला.
परिणामः नापासाचे अधुनमधुन अटळ वार्षिक शिक्के कपाळी म्हज्या.
:
:
शिक्षणाला राम राम ठोकला कायमचा अन वडिलांनी दिलेल्या कामाचा स्विकार केला;
काही काळ ओलांडल्यावर पुन्हा वडिलांच्या इच्छेने एका घरंदाज मुलीशी लग्न,
काम आणि लग्न ह्या दोन्हीं बाबतीत वडलांची इछा बलवत्तर.
:
:
तिशी उलटल्यावरः कौटुंबिक कटू अनुभव उदंड गवतासारखे वाढलेले
आणि मं त्यातुनच सुटकेचा श्वास घेण्यासाठी बेफिकीर असा मी भटकत फिरणारा;
त्या घुस्मटगार अंधारातुन बाहेर पडण्याकरिता सहचरिणीच्या सांगाताने
अपु-रा पैश्यात सुध्दा दुस-रा गावातल्या घरात प्रवेश; तोवर कविता मला पोसत होती.
:
:
गरुडगतीने वर्षे झेपावलीत...दिवसेंदिवस बायकोच्या दिसत असलेल्या आजाराच्या असह्य वेदना;
आयुष्याच्या विचित्र-व्याकुळ सावल्यांमध्ये जिवाला जगवताना मारताना...
कवितेचा भक्कम आधार माझ्या पाठीशी होता...;
आधार म्हणण्यापेक्षा कवितेचा प्रखर शापच माझ्या मागे होता.

No comments: