Monday, March 23, 2009

चुकले मी


त्याचा अलगद हात
माझ्या शरीराचा गुंता
सोडवत असताना;
त्याचा हळूहळू बदलत
असलेला संदर्भ पाहून
मला भोगायला लागल्या
असह्य वेदना...
:
:
तेंव्हा कुठेतरी असं वाटू लागलं की,
आयुष्यात पहिल्यांदाच चुकले मी.
त्यापेक्षा केसांत गजरा, हातात बांगड्या,
ओठांवर भडक लिपस्टीक लावून
बसस्टॉपवर उभी राहिले असते
अन येण्या-रा जाणा-राला विचारलं असतं.
"आता है क्या? सिर्फ छेसौ रुपया.
निदान पैसेतरी कमवले असते.

आड


काळोखाच्या आत
घरा जात;
नको नको ते
दृश्य पहात.
:
:
ईथे-तिथे भासे
निराळा प्रकाश;
आत कुठेतरी खोल
जळतेयं लाश.
:
:
अश्या भलत्यावेळी
कोण होते दाराआड?
पहात पहात लपले
हळूचं काळजाच्या आड.

गर्भ


आतल्या अंधारात
चटावली नार;
खुले द्वार
झाले बघं.
ईथे-तिथे पसरले
प्रकाशाचे पाणी;
उतू गेले
विर्य बेईज्जत.
नको-नकोच आता
वाकून पाहू;
आत गर्भात
फक्त काळोख.

आई सांगते की


वर्षानुवर्षे उलटलीतः
मी वाट पहातोय आजीची.
आई सांगते की,
तू लहान असताना एकदा
आलेली तुझी आजी
काठी टेकत टेकत दारापाशी.
हो...हो...मला आठवतयं
आली होती एकदा आजी दारापाशी आणि
रागाने तशीच निघुन गेली.
मला अजुन एक आठवतयं की,
आजी गेली तेंव्हा
तिने आभाळाकडे पहात पहात हात जोडले होते.

पेन्शनर


सका-सकाळी आपली आवरा आवर करुन खिडकीतून बघणारा,
नेहमी ह्या लोकांच्या गर्दीत कुठेतरी हरवलेला असा;
कुठे जातात ही सारी लोकं ईतक्या घाई-घाईत? काय करतात?
असे काही प्रश्न मनालाचं विचारावेसे वाटतात.
:
:
काळाचं एक-एक पाऊलं पुढे पुढे टाकत, स्वतःलाच सावरत,
मोडलेल्या लाकडी जिन्याचा आधार घेत पुढे सरकताना....
त्याचा तोल जात असताना कोणीतरी संभाळेल असं वाटतं.
कुठेतरी आपल्याला पोचायचयं ह्या विचाराने पाऊलं उतरतं जातयं.
:
:
पुढे रस्त्याच्या कडेला उभं राहून इकडे-तिकडे पहात,
लोकांची भिड पाहून स्वतःचाच घाबरलेला चेहरा;
समोर उघड्यावर बसलेल्या नावीच्या आरश्यात पहायला मिळतो.
थोडी भिरभिरी येता, त्याचं मोडलेल्या जिन्याकडे पावलं वळतात.
:
:
एक-एक पाऊलं चढत असताना त्याच्या जिवाला झालेला त्रास...
आज खुप थकायला झालयं; आज खुप काम केलयं मी.
पुन्हा तिच खिडकी, तोच रस्ता,तेच मुशाफिर,तोच मोडलेला जिना
आणि त्याच सलूनच्या आरश्यात घाबरलेला चेहरा दिसतोय...एका पेन्शनरचा!

प्रखर शाप


जन्मानंतरची पहिली पाच सहा वर्षेः खेळाखेळात गेली,
लपाछपी, बाहुला-बाहुलींची लग्न, पत्यांचा बंगला, भातुकली ई.
नंतरची वर्षे नाते न जुळलेल्या अभ्यासात...जेमतेम मॅट्रिकची पायरी चढलो.
जिथे "कैद ए बामुशक्कद" ची सजा मिळाली.
:
:
काही वर्षांनंतर कविता भेटली; अधुनमधुन तिच्याशी बोलायचो,
तिला वाचायचो...एक दिवस अचानक झटका आला अन थेट तिला
कागदावर उतरवली; तेंव्हा पासुन एक प्रखर शाप मिळाला मला.
परिणामः नापासाचे अधुनमधुन अटळ वार्षिक शिक्के कपाळी म्हज्या.
:
:
शिक्षणाला राम राम ठोकला कायमचा अन वडिलांनी दिलेल्या कामाचा स्विकार केला;
काही काळ ओलांडल्यावर पुन्हा वडिलांच्या इच्छेने एका घरंदाज मुलीशी लग्न,
काम आणि लग्न ह्या दोन्हीं बाबतीत वडलांची इछा बलवत्तर.
:
:
तिशी उलटल्यावरः कौटुंबिक कटू अनुभव उदंड गवतासारखे वाढलेले
आणि मं त्यातुनच सुटकेचा श्वास घेण्यासाठी बेफिकीर असा मी भटकत फिरणारा;
त्या घुस्मटगार अंधारातुन बाहेर पडण्याकरिता सहचरिणीच्या सांगाताने
अपु-रा पैश्यात सुध्दा दुस-रा गावातल्या घरात प्रवेश; तोवर कविता मला पोसत होती.
:
:
गरुडगतीने वर्षे झेपावलीत...दिवसेंदिवस बायकोच्या दिसत असलेल्या आजाराच्या असह्य वेदना;
आयुष्याच्या विचित्र-व्याकुळ सावल्यांमध्ये जिवाला जगवताना मारताना...
कवितेचा भक्कम आधार माझ्या पाठीशी होता...;
आधार म्हणण्यापेक्षा कवितेचा प्रखर शापच माझ्या मागे होता.

Friday, March 20, 2009

पतिव्रता


एकदा माझे स्त्रीत्वाचे आदर्श
माझ्याचं शब्दांनी पेटवले;
तेंव्हा आजुबाजूच्या काही पतिव्रता
भडकून घरी आल्या...
:
:
त्यापैकी दोघी तिघींनी माझ्याचं
मुस्काटात दोन हात ठेऊन दिले;
आणि मला एका खुर्चित बसवून
माझे हात-पाय बांधून टाकले.
:
:
पुन्हा सा-रा जणी आपापल्या
घरी जाऊन आपापल्या नव-रांना
धुवूनपुसून त्यांची पुजा करुन
सा-रांना देव्हा-रात स्थान दिले.
:
:
त्यांच्या या आरत्यांत आणि
घंटानादात माझे शब्द
गुदमरुन गेले...
:
:
तेंव्हा रात्रीचे अडीज वाजले होते!

वस्त्रे


ती स्वतःचीच वस्त्रे हळूहळू
उतरवतं होती;
आणि दाराबाहेर डोकावून डोकावून
पहात होती.
मला समोर पाहून तशीच
नागडी त्या बाजारात धावत सुटली.
अचानक एकदा समोर दिसली
अन म्हणाली...
ईथे येणारा प्रत्येक पुरुष हा षंढ आहे.

कसलं काय?



एक दिवशी घर;

एक दिवशी कार;

एक दिवशी हार;

मी कितीही नको म्हटलं तरी

माझ्या पदरात काही ना काही

टाकतचं असतो दरदिवशी...

कसलं काय?

"दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे"

देताना सारं देतो अन

जाताना मात्र सारं ओढून नेतो.

साधा एक ब्लाउजही ठेवत नाही अंगावर माझ्या!

Sunday, February 22, 2009

आईचे माहेर


आईच्या माहेरी
अंधाराची खोली;
दाट एकटीचे दुःख
ति होते ओली ओली.
गाढ झोप पांघरूण
दिप पेटत राहतो;
कुणी रात्रीच्या-रात्री
डोळे पुसत रडतं राहतो.
काळोखाच्या भितीने हाले
तिच्या काळजाचे पान;
कधी पदरात आले
दर्द मरणाचे दान?
कवी - कल्पेश.

फरक


अश्या एकांताच्या जागी
जाउन छानपैकी
कोसळणा-रा पावसाला
एकदा की नाही मला पाहायचं आहे.
बघूया काय आणि किती
फरक आहे दोघांत...
कवी - कल्पेश.

फक्त एकदा


तुझ्यासोबत भिजताना खुप
आनंद होतो रे...
आठवताहेत ते मस्त दिवस
आपण एकत्र भिजायचो.
आताही माझ्यासोबत थोडावेळ भिज ना रे...
मला बरसताना अजुन
आनंद होईल.
कवी - कल्पेश

तहानलेली


रोजच लोकं आरोप लावतात माझ्यावर...
ही मुलगी नेहमी पावसात भिजते आणि
ड्रिंक्स घेउन गाढ झोपते.
पणं....
ईथल्या लोकांना ऋतू कधी कळाले आहेत?
पडण्या-रा आणि बसरणा-रा पावसातला
फरक सुद्धा कळतं नाही.
कवी - कल्पेश

Sunday, October 19, 2008

"बाहुला - बाहुली"


हा आपला खेळ
बाहुला बाहुलीचा;
दे तुझी बाहुली मला
घे माझा बाहुला तुला.
आपल्या या खेळाखेळात
कसं सजवूया स्वप्नं?
तुझ्या-माझ्या हाती उरेल
फक्त दोघांच लग्न.
तुझ्या बाहुलीला भिती
कोण येईल लग्नात?
माझा बाहुला सांगतो
मी साथ देईन फे-यात.
बाहुला बाहुलीच्या लग्नाचा
कसा सजवूया मांडव?
त्या दोघांनाही आपणं
एकाचं गाठीत बांधाव.
लग्न लग्न खेळता
पुरा कोसळला मांडव;
कोसळल्या ढिगाखालच्या
चुर स्वप्नांना सांगाव...
आता वेळ आली बिदाईची
तशी रडली बाहुली;
बाहुलीने तुझ्याकडे पाहिलं
अन डोळे पुसतं राहिली.
बाहुला बाहुलीच्या या खेळात
स्वप्न चुर चुर झाली;
तु संभाळ तुझा बाहुला
मी जपेन माझी बाहुली.

Wednesday, September 17, 2008

"जुगारी"


रात्रीच्या काळ्याकुट्ट अशा अंधारात,
एका पंचविस वोल्टच्या बल्बच्या अंधूक प्रकाशात;
आपण सारे असावध जुगारी मधोमध आणि
आजूबाजूला उभी असलेली मुशाफिरांची गर्दी.
येत जात असलेली, अधून मधून...
हातांत विस्कटलेले पत्ते.उलटेसुलटे...
तिन कॅटला कत्री मारुन मारुन,
हाताच्या बोटांना झालेली वेदना काही वेगळीच होती.
तेंच पत्ते काळाच्या कर्मठ टेबलावर सा-रांना वाटताना,
आज भरपूर पैसे कमवण्याच्या आनंदात मी.
हळू हळू डाव पुढे सरकत असताना...
माझं उदास झालेलं मन, बाकिच्या जुगा-रांना बघून;
सर्वांच्या हातांत जोडलेले पत्ते पाहून,
माझ्या मनात नकोनकोत्या प्रश्नांच वादळं उठत होतं.
तेंव्हाच मला आस-रासाठी मिळालं एक नवं पान.
जस जसे पुढचे जुगारी खेळत राहिले,
मला कळालं नाही; मी माझ्या प्रश्नांमध्ये हरवलेलो कुठे?

Wednesday, September 10, 2008

" भातुकली"


तसं तुझं आयुष्यःमला नाकळल्यासारखे...
लहाणपणीच्या भातुकलीच्या खेळाची बाहुली अजूनही जपणारी;
तेंव्हा कुठे आठ्वू लागतात भातुकलीच्या खेळाचे दिवस्
खेळाखेळात बाहुलीला रडताना पाहिल्यावर, तु तिचे अलगद डोळे पुसणारी.


ये माझ्या सोबत खेळायला...ये माझ्यासोबत...असं तु मला नेहमीच सांगायचीस
पणं, मी आपल्याच मस्तीत मस्त;सा-रा जगाचा विसर पडल्यासारखा असा,
तरीसुद्धा तुझा आपला एक घराचा कोपरा ठरलेला खेळायसाठी,आठवतयं अजून मला
खेळायला बाहुलीला सांगणारी तू एकचं..."माझ्यासोबत खेळ""माझ्यासोबत खेळ"...


मी आपला दुरुनच तुझी मज्जा बघतं;अन तुझी मस्करी करत उभा
तसे तुझे पाणावलेले डोळे अन हातात बाहुलीला घट्ट धरुन,
तुझ्या लांबलचक फ्रॉक ने डोळे पुसत तु निघुन जायचीस...
प्रत्येक वेळी हे असचं होणार आपल्यात,हे तुला ठाऊक होत.


फार फार दिवसांनंतर तु पुन्हा बाहुलीला घेऊन,खेळायला माझ्यादारात
मी ही अजून तसाच....तुझ्याकडे बोट दाखऊन मुद्दाम हसणारा;
आलीस आणि माझ्या हातत तु बाहुली देऊन गेलीस...
मी दारावरच उभा एकटा...एकाकी...दूर,काही उत्तरांना शोधत.

Sunday, August 24, 2008

"सीक्वेन्स"



माझे आयुष्यं तसे एका रमीच्या डावासारखं आहे,
जिवनातली तेरा बर्षेःजशी तेरा पानं वाटलेली स्वतःहून स्वतःला;
उरली फक्त एकेचाळीस वर्षेःएकेचाळीस पानांसारखी,खाली राहिलेली
त्यातही दोन जोकर आहेतच कुठेतरी पत्यांमध्ये लपलेले.


एखादं पानं उचलून जुळवावं म्हटलं तरं...
नेमकं तेचं उचललेलं पान दगा देऊन जात समोरून,
जसं आयुष्यातं एक वर्ष रडवून जातं ना तसचं काहितरी
परत पुन्हा वाट बघत राहतात हातातली तेरा पानं...पुढल्या पानाची.


खुप त्वेष येतो,जेव्हां उचललेलं एक एक पान जुळत नाही
ती वेळचं तशी असते...जसं एखादं वर्ष आयुष्याशी जुळत नाही,
जेंव्हा खाली राहिलेली पानं हातातल्या पानांशी जुळत नाहीत...
त्यावेळी वाट पहावी लागते एका जोकरची...भेटेलचं कधीतरी तो.


मी वाट बघतोय केव्हांपासुन सीक्वेन्स जुळायची,
फारचं क्वचित जुळतात सीक्वेन्स हे मला माहित आहे;
कधीपासुन अडून बसलोय एका पानासाठी(उदाःबदाम राणी)
कधीतरी अचानक भेटेल ती आणी सीक्वेन्स पुर्ण होईलचं.

Friday, August 22, 2008

"तिचं आभाळभर दुःख"


दार अर्धे लोटलेले दिसलेः
दाराआड लपलेली तु; स्वतःला लपवत,अंधाराच्या पलिकडे
तू अवचित समोर येतेस, नग्नावस्थेत असून...
तेंव्हा तुझी अवस्था पाहुन कोणाला तरी जाग येते.
तुझ्या स्तनांवरुन खाली आलेल्या मोकळ्या कुंतला,
अन तसे तुझे दोन्ही हात योनीला झाकलेले;
तरिही, स्वतःला झाकण्याच्या पुर्ण प्रयत्नात...तिरकस उभी तू
कुशिवर असलेल्या लाल भडक खुणा मला दिसणारचं.
थांब...थांब...अशी एकाएकी पाठ नको दाखवू मला
तुझे नितंब झाकण्यासाठी तुझ्याकडे काहीचं नाही आहे;
हे तुला माहित होत, तरीसुध्दा तू दार बंद करुन घेतलेस
तेंव्हा तिचं आभाळभर दःखं माझ्या डोळ्यांत मनात मावलं नाही.

"काठी"


नावेतुन उठता खाली
मागे राहिला गाव;
कोठे आलो आकळेना
माझी सुटली नाव.


पुढे सुक्या वाळूचे ढिग
नसो चलण्याला अंत;
पायाखाली आभाळाच्या सावल्या
कुठल्या दिसे जिवंत?


चालता चालता पाउलं
ढिल्या वाळूत रुतत जाते;
तेंव्हा, माझे थकलेले आयुष्यं
काठी टेकत चालते.

Friday, August 15, 2008

"नवा अर्थ"


अर्ध्या झोपेत आईच्या
बाळं रडण्याचा आवाज;
तशी तिला आली
थोडीशी झोपेत जाग.
तिच्या स्तनांना हळूचं
मऊ ओठांचा स्पर्श;
रात्रीच्या गूढ तंद्रित
आईच्या दुधाला नवा अर्थ...
बाळं निजून गेलं, अन्
हालली जराशी माय;
बाळाच्या ओठी आली
रात्रीच्या दुधाची साय.