Sunday, August 24, 2008

"सीक्वेन्स"



माझे आयुष्यं तसे एका रमीच्या डावासारखं आहे,
जिवनातली तेरा बर्षेःजशी तेरा पानं वाटलेली स्वतःहून स्वतःला;
उरली फक्त एकेचाळीस वर्षेःएकेचाळीस पानांसारखी,खाली राहिलेली
त्यातही दोन जोकर आहेतच कुठेतरी पत्यांमध्ये लपलेले.


एखादं पानं उचलून जुळवावं म्हटलं तरं...
नेमकं तेचं उचललेलं पान दगा देऊन जात समोरून,
जसं आयुष्यातं एक वर्ष रडवून जातं ना तसचं काहितरी
परत पुन्हा वाट बघत राहतात हातातली तेरा पानं...पुढल्या पानाची.


खुप त्वेष येतो,जेव्हां उचललेलं एक एक पान जुळत नाही
ती वेळचं तशी असते...जसं एखादं वर्ष आयुष्याशी जुळत नाही,
जेंव्हा खाली राहिलेली पानं हातातल्या पानांशी जुळत नाहीत...
त्यावेळी वाट पहावी लागते एका जोकरची...भेटेलचं कधीतरी तो.


मी वाट बघतोय केव्हांपासुन सीक्वेन्स जुळायची,
फारचं क्वचित जुळतात सीक्वेन्स हे मला माहित आहे;
कधीपासुन अडून बसलोय एका पानासाठी(उदाःबदाम राणी)
कधीतरी अचानक भेटेल ती आणी सीक्वेन्स पुर्ण होईलचं.

No comments: