Sunday, July 8, 2007




ना बघीतले कधी सुख आयुष्यात
ना दिसला कधी आपलेपणा आपल्यांत


सुखाच्या वाटा पसरल्या ईकडे तिकडे
ह्या दुःखाचे ओझेच जाणवती अता सगळीकडे.


कशाला बघतोस वाट त्या सुखाची?
ते दुःखच नेहमी खेळती तुझ्या आयुष्याशी


काय करशील सुखाची वाट पाहुनी आता
ते दुःखच तुझे मित्र बनले शेवटी जाता जाता


नको विसरुस त्या मित्रांना तुझ्या मेल्यानंतर
ज्यांनी तुला एवढी साथ दिली तुझा शेवट होई पर्यंत.


(कल्पेश फोंडेकर)

1 comment:

Chinmay 'भारद्वाज' said...

फारच सुंदर कविता आहे. सुरेश भटांसारखी शैली आहे. अश्याच कविता करत रहा ही विनंती.