Tuesday, October 30, 2007

दगड सारे सजलेले......



गाभा-रात दिसतात दगड सारे सजलेले
पाय-यांवर लोकं गळून होते पडलेले...!


त्याला म्हणावे का 'देव' बरे आम्ही?
त्यानेच जिते काही दळून होते कुटलेले...!


ते आम्हास दर्शन देऊ पहातात खरे
पणं त्यांचे नशिब आधीच होते फुटलेले...!


कुठला देव,कधीचा,कोणी पाहिला ईथे?
पाहिले तेव्हा दगड दिसले होते सजलेले...!


(कल्पेश फोंडेकर)

Saturday, October 27, 2007

तिला अंधारात शोधत राहीले...


ति माझ्या मागून मागून चालत होती...
मी मागे वळून पहायचो तर सारखी लपायची
मला कळत नव्हतं मी तिला कसं पकडू?
असं वाटत होतं कि आमच्या दोघांत
लपाछूपी चा खेळ चालत होता...
मी पकडण्याचा प्रयत्न करायचो तर
सारखी दूर पळायची आणि हसायची.
कळत नव्हतं मला अता काय करावं?
शेवटी ठरवलं मी सरळ चालत रहायचं
मागे वळून न बघता...
चालता चालता सांज झाली...
मागे वळून पाहिल तरं ति दिसेनासी झाली.
आणि माझे डोळे तिला अंधारात शोधत राहीले...
शोधत राहीले...
(कल्पेश फोंडेकर)

Monday, October 22, 2007

शेवटी तिला सुर्याचं दुःख कळालं....




ति त्याची वाट पहात होती

समुद्र किनारी...!

खुप वेळ झाला अजून आला नाही

अजून आला नाही....!

तिचा जिव कासाविस होत होता...

सारखी घड्याळाकडे एकटक बघत होती.

मद्येच तिच लक्ष बुडणारया सुर्याकडे जायचं.

ति हळूहळू विचार करायला लागली

आज तो आलाच नाही तरं?

तिच्या मनातं असे खुप प्रश्न येत होते.

सुर्य बुडून गेला पणं तो काही आलाचं नाही..

शेवटी तिला सुर्याचं दुःख कळालं.

(कल्पेश फोंडेकर)

Saturday, October 20, 2007

अश्रुंसाठी नयन कशाला?




एकटीच मी रडते आहे, अश्रुंसाठी नयन कशाला?
जगायचेच जर एकट्याने,अश्रुंची तरी साथ कशाला?



तुझा चेहरा,तुझे अस्तीत्व अन् तुझा भास
भेटशील तु वा दुसरे कुणी,याचा आज विचार कशाला?



दुःख माझ्या आयुष्याची कधी रुसली ना रडली
साथ मज मिळेल वा न मिळेल,याची आज चिंता कशाला?



प्रेमाचा जर अंशूच नव्हता तुझ्या मनात
तर, तुझ्या ओठांवर माझ्या नावाचे शब्द कशाला?


(कल्पेश फोंडेकर)

Monday, October 15, 2007

तिच व्याधी, तिच दुःख...(भाग-४)




तिच व्याधी,तिच दुःख मी स्मरू किती?
माझ्या स्वप्नानां आज मी जाळू किती?



थकले अता पाय माझे चालूनी चालूनी
'जगायचे' हे सत्य मी टाळू किती?



भरावयास लागतील झालेल्य़ा जखमा ह्या
काळजाला लागलेले घाव मी मोजू किती?



एकेक श्वास माझा मी सोडायास लागलो
न येणारया मरणाची वाट मी पाहू किती?


(कल्पेश फोंडेकर)

Friday, October 12, 2007

तू एक माणूस आहेस...




ए...ए थांबना थोडावेळ...थांबना...!

बोल ना माझ्याशी थोडसं...

असा जाउ नकोस चेहरा लपवून आज.

नेहमीच शांत शांत असतोस...

काहीतरी बोल ना माझ्याशी आज...

ए...ए थांबना थोडावेळ...थांबना.

मि विचारल तु आहेस तरी कोण मला विचारणारी?

तिने उलट उत्तर दिलं मला...

तू एक माणूस आहेस...एक माणूस.

(कल्पेश फोंडेकर)

Thursday, October 11, 2007

खरचं आवडतं मला...



आवडत मला...

सायंकाळी समुद्र किनारी फ़िरायला
ओल्या वाळू वर अलगदपणे
पावलं टाकायला....


खुप मज्जा येते त्या
ओल्या वाळूला उघड्या
पायांनी स्पर्श करायला....


आवडत मला...

त्याच वाळूवर काही क्षण
निवांत बसुन त्या मावळत्या
सुर्याकडे एकटक बघत बसायला...

आवडत मला ...

त्या समद्रात बुडणारया
सुर्याकडे पहात पहात
गेलेले दिवस आठवत बसायला...

आवडत मला...

बुडलेल्या सुर्याला
पाहता पाहता
ऊद्या च्या नविन
किरणांची वाट पाहायला....

खरचं आवडतं मला...

(कल्पेश फोंडेकर)

Monday, October 8, 2007

जगण्याचा खेळ पुरे....



दुःखांचा थांबव प्रवास तुझा
सांगतो एक एक मज अश्रु अता


मी उन्हात चाललो नेहमी
सावलीचा नको मज आधार अता


दुःखाचा बाजार पाहिला सर्वत्र
सुखाचा नको सांगु मज भाव अता


एक एक घोट पिउन आसवांचा
त्या अश्रुंचा कर्जबाजारी झालो अता


जगण्याचा खेळ पुरे झाला तुझा
सांगतो एक एक श्वास मज अता


(कल्पेश फोंडेकर)