Wednesday, July 25, 2007

तिचं व्याधी, तेचं दुःखं - भाग ३





तिचं व्याधी, तेचं दुःखं रोज मी स्मरु किती?
ह्या तडफ़णारया जिवाला रोज मी रोखू किती?


तेच तारे,तेच आकाश रोज मी पाहू किती?
तिचं रात्र,त्या काळोखात रोज मी जागू किती?


त्याचं वाटा,तेचं रानं रोज मी हिंडू किती?
तिचं झाडे,तेचं काटे रोज मी चालू किती?


तोच समुद्र, त्याच लाटा रोज मी झेलू किती?
ह्या बुडणारया मनाला रोज मी सावरु किती?


त्याच कळा,त्याच जखमा रोज मी सांगू किती?
ह्या घायाळ जिवाला रोज-रोज मी पोसू किती?


(कल्पेश फोंडेकर)

Friday, July 20, 2007

तिचं व्याधी, तेच दुःख - भाग २




तिचं व्याधी, तेच दुःख रोज मी स्मरु किती?
तेच दिवस, तेच क्षण रोज मी आठवू किती?


तिचं वाट, तेच अंतर रोज मी कापू किती?
ह्या भटकत्या जिवाला रोज मी शोधू किती?


तिचं वळणं, तिचं माणसे रोज मी बघू किती?
तेच आवाज, त्याच हाका रोज मी ऐकू किती?


तिचं गाणी, तेच स्वरं रोज मी गाऊ किती?
तेच दर्द, तेच घाव रोज मी सोसू किती?


तिचं यातना, तोच चेहरा रोज मी पाहू किती?
तेच मनं, तेच अश्रु रोज-रोज मी दाखवू किती?


(कल्पेश फोंडेकर)

Monday, July 16, 2007




उन पाण्यावर तरंगत होते
सोबतीला पाणी का चकाकत होते?


टाळले मिच त्या चकाकीला
काय तिथे माझे मनं होते?


जन्म स्वप्नातं जगलो सारा
काय मला माझे कळत होते?


आठवे मज कधी हार माझी
उंच माझी तशी मान का होते?


बंद झाले दरवाजे आयुष्याचे
तिथे कोणी हाक मारत का होते?


जिन्दगी एक बाग होती
वेदनांचे तिथे रान का होते?


आयुष्यातं होतो हसत,खेळत...
मृत्युचे सोबत माझ्या चालणे का होते?


(कल्पेश फोंडेकर)

Friday, July 13, 2007




कोण जाणे कुणाचे किती दिवस उरले?
ते अश्रुच तुझे सारे ईथे वाहुन सुकले


काय किंमत ईथे त्या अश्रुंची?
कधी दिसेल का ही व्याधी मनाची?


कोण बघेल तुझं दुःख ईथे?
जिथे सारे जगं हे गेल्यात भासे


नको सर्व आयुष्यं काढु ह्या जळण्यातं
हे आयुष्यचं किती उरलं आहे कळण्यातं?


कोणाला दाखवशील ही व्याधी मनाची?
ईथे तर सारेचं आपले रडताना दिसती.


(कल्पेश फोंडेकर)

Thursday, July 12, 2007




पाल्यातली वादळं पाल्यातच संपवावीत
आयुष्याची स्वप्नं,स्वप्नातचं पहावीत

आलीच वादळे कधी आयुष्यातं
पावले आपली हळुच संभाळावीत

पाहिले कधी एकांतात सावलीला
दुःख सारी नं रडता दाखवावीत

नाही सुटले कधी प्रश्न आयुष्याचे
मनाला एकदाच उत्तर विचारावी

भेटलेचं कधी मरणं शोधता-शोधता
लाकडं ही सारी जमा करुनचं ठेवावीत

(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, July 10, 2007




मित्रा,मैत्रीत,तुझा हात का नाही?
येणारे क्षण सारे हसणारे नाही।


मी कुठे होतो दुकटा? मी कुठे होतो फ़ुकटा?
मी मोजली होती नाणी ती तुझ्यापेक्ष। कमीच होती


सोसले होते जरी दुःख संयमाने तुझ्याजाण्याचे
एकदा माझ्या डोळ्यातं अश्रु दिसले होते


मैत्रीची सारी पाने आपली कुठे कोरीच होती?
त्यापैकी एखाद्या पानावर आपल्या मैत्रीची कहाणी होती


कुठे गेलास तु? मैत्री तुझी का आटली, आता?
कुठे गेलास तु? डोळे तुझे का भरले, आता?


तुझ्या तो मैत्रीचा श्वास पुरे होता जगण्यास माझ्या
देशील का परत हात तुझा मैत्रीस माझ्या?


(कल्पेश फोंडेकर)




एकदा मला मोकळ्या हवेत श्वास घ्यायचे आहेत...
आयुष्याचे ओझ उचलुन
पुर्णपणे थकलोय मी आता
थोडीशी विश्रांतीची गरज आहे मला
कोणी देईल का मला थोडीशी विश्रांती
बाजारात ह्या गोष्टी नाही विकत मिळत
नाही कधी मिळणार
नाहीतर कधीच शोधुन मी घेतली असती.
नाही कोणती मैत्री ही विश्रांती
देऊ शकते नाही कोणत नातं देऊ शकत.
आयुष्याचे हे ओझे नकोसे वाटते आता मला
रान रान भटकलो त्या आयुष्याच्या
शोधात पणं आयुष्य हे कुठेच नाही सापडलं.
किती जखमा झाल्या ह्या शरीराला
किती किती यातना सोसाव्या लागल्या
मायेच्या जाळ्यात गुंतुन आपल्यांनाच सोडाव लागलं
ह्या आयुष्यानेच दिल्या साऱ्या यातना
जेव्हा कधी विचार केला आयुष्याचा
तेंव्हा त्याने ते अश्रु सारे भेट म्हणुन दिले.
आता कुणाचा हात पकडेल हे आयुष्यं
कोणता आसरा आहे ह्या एकट्या जिवाला
हे जगणं बहुदा माझ शेवटचचं
अस वाटतं कि एका क्षणीच
सारे आयुष्य संपउन मोकळ्या हवेत
जाउन थोडेसे श्वास घ्यावे.


(कल्पेश फोंडेकर)

Monday, July 9, 2007




कोण जाणे कुणाचे किती दिवस उरले?
रडलेले अश्रु रात्रभर मोजताना होते पाहिले


नको दाखवुस कुणाला तुझ्या यातना
ईथे सारेच बाटलेले दिसतात मरताना


जिथे सारे आयुष्यचं गेले व्यर्थ
तिथे त्या दुःखाला तरी काय अर्थ?


नको जगु हे आयुष्यं तुकड्यातं
जिथे तुला आपलेचं दिसले परक्यांत


नको कऱुस लालसा ह्या शरीराची
शरीरचं शेवटी साथ सोडी आयुष्याची


(कल्पेश फ़ोंडेकर)

Sunday, July 8, 2007




ना बघीतले कधी सुख आयुष्यात
ना दिसला कधी आपलेपणा आपल्यांत


सुखाच्या वाटा पसरल्या ईकडे तिकडे
ह्या दुःखाचे ओझेच जाणवती अता सगळीकडे.


कशाला बघतोस वाट त्या सुखाची?
ते दुःखच नेहमी खेळती तुझ्या आयुष्याशी


काय करशील सुखाची वाट पाहुनी आता
ते दुःखच तुझे मित्र बनले शेवटी जाता जाता


नको विसरुस त्या मित्रांना तुझ्या मेल्यानंतर
ज्यांनी तुला एवढी साथ दिली तुझा शेवट होई पर्यंत.


(कल्पेश फोंडेकर)



आज आयुष्यं हे हरुन बसलो मी
ते डोळ्यातले अश्रु पियुन जगलो मी


गळताचं हे अश्रु डोळ्यातुन, हसणे हे राहुनी गेले
पहाताच त्या अश्रुंना, डोळे हे अश्रु पुसायचे सांगुनी गेले


कळली कधी का त्या अश्रुंची किंमत ईथे?
ज्यासाठी आयुष्यच सारे खेळुनी पाहीले होते


कशी संपेल ह्या आयुष्याची व्हाधी ईथे
साऱ्या आयुष्यानेच केली दुःखाशी मैत्री जिथे


कळताच थोडे आयुष्य जगणे हे कठिण झाले
दिसताच ते सुखं मरण हे शोधीत आले


(कल्पेश फोंडेकर)



सुख नाही, दुःख आहे जरा ऎकुन घे तु
जखम नाही, जखमा आहेत-जरा पाहुन घे तु


पाय वाटही इथली पुढे रस्ताल्या जाते
मजा नाही, सजा आहे-जरा समजुन घे तु


मोठे ढग दिसतात खरे पणं पाउस नाही
पाउस नाही,दंव आहे-जरा निरखुण बघ तु


सारेच प्रेम करताना तुला दिसतील ईथे
प्रेम नाही,धोका आहे-जरा जाणुन घे तु


कधी ईजा झाली तर तुलाही काळजावर
ईजा नाही,घाव आहे-जरा सोसुन घे तु


(कल्पेश फोंडेकर)


काटयाची वाट...

काटयातुन चालता चालता
काटा रुते पायात पणं
वेदना होई मनातं
आणि डोळयातुनं थेंब
पडती जखमेवर...


काट्यातुन चालता चालता
प्रत्येक क्षणी वाट पाहिली
तुझी अशी की...
तु मला हात देशील
एकदा तरी...
पणं तुच कुठे दिसेनासे
झालास सर्वत्र दिसले ते
फ़क़्त काटे आणि काटेच....


काटयातुन चालता चालता
तुझी वाट पाहता पाहता
दुर गेली माझी वाटं
सर्वत्र तुला शोधूनी
निघुन आली माझी पहाट...


काट्यातुन चालता चालता
पहाटेचं दवं पहाता पहाता
डोळयांमद्ये तुझ्या आठवणींचे
थेंब भरुन आले
आणि शेवटपर्यंत ते थेंब
गळतच राहिले
गळतच राहिले...

(कल्पेश फोंडेकर)
रडली ती माय...

माय ही घराबाहेर गेली
तिच्या लेकराच्या उपाशी पोटासाठी
तिच लेकरु हे रडत होत
दिवसें दिवस थोड्याश्या अन्नासाठी...


पडताच बाहेर घराच्या ति गेली
लोकांच्या दारी दारी
कळलेच नाही जगं तिला
लोक ही हसली तिला वेळोवेळी...


फ़िरत राहीली ति दिवस दिवस
लेकराच्या उपाशी पोटासाठी
दिसली नाही नजर तिला साऱ्या लोकांची
तिच्या अंगावरल्या फ़ाटक्या साडीसाठी...


फ़िरुनी आली परत घराकडे
गाव हिंडुनी सारा
लेकरु हे धावे तिच्या मागे मागे
तिचा पदर धरुनी काळा....


झटकुनी पदर परत माय
चालली सोडुनी लेकरासं
मागे वळुन पहाताचं
लेकरु हे हसुन बघती मायेस
माय ही रडुन बघती लेकरास...


(कल्पेश फोंडेकर)



तिच व्याधी,तेच दुःख रोज मी स्मरु किती?
या अनोळखी जगात आपलेपणा शोधु किती?


नेहमीच दिसती ह्या डोळ्यांना इवलेसे धुके
पणं पिसाट वादळांना आज आवरु किती?


राहिला तुझा न भास,राहिला न श्वास
जे दिलेस होते रंग,त्या रांगोळीत भरु किती?


संपले न गीत हे अजुन आयुष्यातले
सुख-दुःख,आनंद-राग,सांग दाखऊ किती?


मिच यायचे दुरुन,जवळ तु नसायचे
एक एक मिनिट माझेच मी मोजु किती?


(कल्पेश फोंडेकर)

तुझ्या यशाचे दिवे....
वाटेवरती तुझ्या झळकतील
जेव्हा नव्या तारकांचे दिवे
आनंदाने गाणे गातील तेव्हा
नवनव्या पाखरांचे थवे...
आनंदाच्या त्या क्षणांना तु
डोळ्यांत हळुवारपणे साठऊन ठेव
पापण्यांच्या अंतरंगात ते क्षण
हळुवारपणे जपुन ठेव...
किंचीतशी मरगळता येईल तुला तेव्हा
जेव्हा हे क्षण आठवु लागशील तु
तुझ्या प्रत्येक श्वासा-श्वासात
नव्याने प्राण भऱु लागतील ते क्षण सारे...
असेच तुझे यशाचे दिवे
उजळ कर तु भविष्यात
तुझ्या उजळलेल्या दिव्याने
साऱ्या जगाला उजळुन टाक तु...
(कल्पेश फोंडेकर)




तुझ्या मैत्रीची सावली....

सावली...
तुझ्या चेहऱ्याची सदैव दिसे नजरेत मला


सावली...
तुझ्या शब्दांची सदैव आठवे भुतकाळ मला


सावली...
तुझ्या हाताच्या स्पर्शाची सदैव जाणवे खांद्यावर मला


सावली...
तुझ्या एका हाकेची सदैव धिर दीई मला


सावली...
तुझ्या हास्याची सदैव हसवी मला


सावली...
तुझ्या सुखाची सदैव आनंदात ठेवी मला


सावली...
तुझ्या दुःखाची सदैव अश्रु देई मला


सावली...
तुझ्या अस्तित्वाची सदैव सोबत नेई दुर मला....


आनंदाचे सारे क्षण एकमेकांकडे हसत बघताना
आयुष्यातले सारे क्षण तुझ्या मैत्रीच्या सावली सोबत जगताना....


(कल्पेश फोंडेकर)

Saturday, July 7, 2007




मला ही वाटतं कधी कधी...
वाटतं कधी कधी त्या एकट्या
मनाला कुणाची तरी साथ हवी...
त्या रडण्याऱ्या डोळ्यांना कुणीतरी
आपल्या हातांनी पुसावं...
त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या
आयुष्याची साथ द्यावी...
त्या हरवलेल्या आठवणींना
एकदा तरी हाक मारावी...
त्या गुंतलेल्या आयुष्याला
कधी तरी गुंत्यातुन सोडवाव...
त्या स्वप्नातल्या मोडलेल्या घराला
एकदा तरी प्रेमाने बांधाव...
त्या घरातल्या अबोल भिंतींशी
कधीतरी एकटेपणात बोलाव...
मला ही वाटतं ह्या एकटेपणात
कधी कधी एकटच कोपऱ्यात
बसुन थोडस रडावं...

(कल्पेश फोंडेकर)

प्रत्येक नातं......
प्रत्येक नातं पाण्य़ाच्या
थेंबा सारख वाटे ईथे
ईवल्याश्या थेंबानेही
डोळे भरुन वाहे ईथे...
पडता पडता हे थेंब
मातीस जाउन मिळे
पहाता पहाता त्या मातीस'
सारी जमिन ओली भासे...
वाहता वाहता पाणी हे
शेवटी सागरास जाउन मिळे
पहाता पहाता त्या सागरास
तो ही अस्थिर दिसे...
दिसता दिसता त्या आठवणी
डोळयात ओल्या दिसे
पहाता पहाता तुला हे
मनं उगीचच रडत बसे....
(कल्पेश फोंडेकर)



कोण जाणे कुणाचे किती दिवस उरले?
सोसताच थोडे दुःख ह्या ओठांनी हसणे सोडले

कसा मिळेल आनंद तुला ह्या आयुष्यात?
जिथे तुझ्या दुःखानेच मैत्री केली कायम तुझ्या सोबत

कुठे शोधशील स्वतःला ह्या हरवलेल्या आयुष्यात?
कसा हसशील तु त्या आयुष्याच्या एका रडलेल्या कोपऱ्यात

कसे मोजशील अश्रु त्या रडलेल्या आठवणींचे?
कुठे स्वप्न बघशील त्या न येणाऱ्या क्षणांचे

कोण जाणे कुणाचे किती दिवस राहीले?
चालताच थोडी पावले आयुष्य हरुन मनं हे रडले.


(कल्पेश फोंडेकर)

स्पर्श....
तुझ्या मैत्रीचा स्पर्शच वेगळा.....
स्पर्श...
तुझ्या मैत्रीचा मनास माझ्या आठवण करुन देई तु असन्याची
स्पर्श...
तुझ्या हाताचा माझ्या डोळ्यांना सतत माझे रडलेले अश्रु पुसती
स्पर्श...
तुझ्या पापण्यांचा सदैव माझ्या डोळ्यांना सावली देई
स्पर्श...
तुझ्या केसांचा सतत मला सावली देई एका झाडासारखी
स्पर्श...
तुझ्या हसण्याचा सतत मला हसणे शिकवते दुःखात सुध्धा
स्पर्श...
तुझ्या मिठीचा सदैव माझे रक्षण करी बाहेरच्या जगापासुन
आपली ही मैत्री जगावेगळी
तुझ्या मैत्रीचा स्पर्श हा त्याहुन ही वेगळा....
(कल्पेश फोंडेकर)



दिवस मावळता मावळता
आठवण तुझी अशी
येते की डोळयातील
अश्रुंची वेदना जाणवते
मनात...
पणं ह्या मनाच
काय करु मी तुच
सांग आता...
कारण...ह्या मनाला
दुःख जळन्याच नाही आहे
ह्या मनाला दुःख आहे
ते फ़क़्त एकट्याने
जळन्याचे आहे...
ह्या एकट्या जळन्यारया मनाला
संभाळता संभाळता जुन्या
काही आठवणी ही
जळत असतात...
काही जळलेल्या आठवणींची राख
जळत असलेल्या मनातील आगीला
सतत फ़ुंकर घालत असते...

(कल्पेश फोंन्डेकर)


सांगतो आहे मला मी
बघतो आहे मला मी

गाव आहे आपल्यांचा
परका दिसतो मला मी

पाहिले देऊन सगळे
पहातो आहे मला मी

ढाळताना आसवेही
हसतो आहे मला मी

दुःख माझेच आहे
सांगतो आहे मला मी

अश्रु माझेच होते
दाखवतो आहे मला मी

चेहरा माझाच होता
खुणवतो आहे मला मी

या जगाचे नियम खोटे
शिकवतो आहे मला मी

(कल्पेश फोंडेकर)



आयुष्य हे कळुन चुकले आता
ह्या चार दिवसांचे मला जाता जाता...

जेव्हा ह्या शरीराने यातना सोसल्या साऱ्या जळण्याच्या
तेव्हा त्या दिवसांनी मोह घातला आयुष्य अजुन जगण्याचा....

कळत कळत दुःख सारे सोसले आयुष्यात
नकळता मरणं आले शोधत त्या सुखात....

जळले ते शरीर त्या ओल्या-सुक्या लाकडांवर
तेव्हा दिसले ते निखारे जळुन झाल्यावर.....

विजुन गेली ती आग रात्रीच्या गारव्यात
शेवटी रात्रच जागी होती त्या जळत्या निखाऱ्यां सोबत.....

(कल्पेश फोंडेकर)