Thursday, February 28, 2008

चारोळ्या...

सख्या...
आज काल नं
मला काही कळतचं नाही
तुला पाहिल्यावर
जिव माझा जळतचं नाही.
-------------------------
सख्या...
एक दिवशी कि नं मी
आभाळं होऊन बसणार आहे
तू नाही बोललासं कि मं
स्वतःवरचं मुक्यानं बरसणारं आहे...
-----------------------------------
सख्या...
एकदा कि नाही मला
कोप-रात बसुन रडायचयं
तु माझ्याकडे पाहिल्यावर
तिथेच बसुन पुन्हः हसायचयं
-------------------------------------

तूं...


तूं...
माझ्या सख्या सारखाचं
आहेस थोडा थोडा;
दिवसा तापत असतो अन्
सांज झाली कि लपत असतो.

"सखा आणि सांज"


आज किती तरी दिवसांनी...
संध्याकाळच्या आकाशाचा एक फळा बनवला
अन त्या फळ्यावर चित्र काढ़ू लागले
पाहिलेल्या स्वप्नांची!
काही चित्र पुर्ण झाली आणि काही
अपुर्ण राहिली...
त्या अपुर्ण चित्रांमध्ये एक चित्र
माझ्या सख्याचं होतं.
माझ्या सख्याचं होतं.
कधीतरी तो मला भेटेल ह्या सांजवेळी
अन माझं स्वप्न पुर्ण होईल...

Saturday, February 23, 2008

"मला मद्य नाही देत"!



असा रात्रीचा

भरलेला प्याला

घेऊन जवळ

येऊ नकोस रे...

बघ हे आभाळ

किती भरलयं...

नंतर तुच

दोष देतोस

ह्या आभाळाला

बरसुन गेल्यावर...

"मला मद्य नाही देत"

"मला मद्य नाही देत"!

Sunday, February 17, 2008

मी संपुर्ण भिजते...



हल्ली नं मला तुझे खुप

लाड करावेसे वाटतात...

पणं,तू असा माझ्याकडे

लहान बाळासारखा हट्ट करु नकोस रे...

जे तुला हवयं ते मला देताना

माझी किती धांदल होते...

नाही दिलं तरं तुच

माझ्यावरं बरसतोसं

आणि मी संपुर्ण भिजते...

Friday, February 15, 2008

मि बाकी किती उरली?



सख्या...एक दिवशी तु मोठा

गणितज्ञ होशील...

पाऊस कधी,कुठे,किती पडणारं

हे तु बिनचुन सांगतोस दुस-रांना!

सख्या...एकदा माझ्याकडे बघुन

सांगना रे मला मि बाकी किती उरली?

Monday, February 11, 2008

मी वाटेवर मरण्याच्या...



राहतो जरी ऊभा घोळक्यांत माणसांच्या
एकटाच रडतो कधीतरी कोपरयातून मनाच्या!


चाललो जरी आज कडे-कडेने रस्त्याच्या
पावले ही मागेच वळती रेषेत भुतकाळाच्या!


सांगितल्या जरी कथा कुणाला दुःखाच्या
जो-तो म्हणतो त्या तर सारया हसण्याच्या!


थांबलो जरी आज ईथे आनंदात जगण्याच्या
चालतो नेहमी नेहमी मी वाटेवर मरण्याच्या!

Tuesday, February 5, 2008

आकाश ते मालवून गेले...



मोठे तारे तरं कधीचं तुटून गेले
छोटे तारे सारे प्रकाश देऊन गेले!
काळोख प्रकाशाच्या या युध्दात
हे सारे आकाश कधीच थकुन गेले...

----------------------------------------------

चमकणारे सारेच तारे हरुन गेले
का दशा ह्या विश्वाची ते करुन गेले!
कुठे भेटतील अता ते तुटलेले तारे?
जाताना हे सारे आकाश ते मालवून गेले...

Monday, February 4, 2008

घरातल्या पलंगावर बसुन...




ति एक व्यक्ती


मनाने बाळ असलेली...


त्या व्यक्तीला हे जग


नकोस झालयं अता...!


कधीकधी आयुष्यं जगताना


विचार करते...


"का नाही मला लहान


राहू दिलं इथल्या लोकांनी?"


पणं,अता मरणाच्या दारात


उभी असताना येणा-या


प्रत्येक नविन गिराईकाची


आतुरतेने वाट पहाते,


घरातल्या पलंगावर बसुन...

Saturday, February 2, 2008

कवितांच्या युध्दाची...

(१)
अता नको भिक
कुणा आपल्याची
अता खरी गरज
आहे स्वबळाची...
(२)
अता नाही वाटत
भिती हरण्याची
अता आहे एकच
जिद्द जिंकण्याची...
(३)
अता हातात घेतली
तलवार शब्दांची
अता नाही पर्वा
कुणाच्या हृदयाची...
(४)
अता मेली भिती
शत्रुंच्या वाराची
अता वेळ आली
आपल्यांशी लढ़ण्याची...
(५)
अता करुया तयारी
शब्दांच्या वाराची
अता वेळ आली
कवितांच्या युध्दाची...

कोसळली पहा ईथली वास्तू...


शोधतो आम्ही एक एक वस्तू
कोसळली पहा ईथली वास्तू
कोण परतेल परत ह्या ठिक़ाणी?
नाही दिसतं कोण ईथे परंतू....
वाटतो हा ओसाड गाव सारा
आनंद हा लुटून गेला वारा
किती किती अडवले वा-राला
वादळं घेउन गेला सारा पसारा...
नको अता हा उदास निवारा
ढळला कधीच मुख्य तारा
कुठे सापडेल आज ईथे
शब्दांना मिळणारा एक सहारा...?