Saturday, May 31, 2008

चर्चमध्ये जाता



पहाता पहाता
असे दिसले;
आतल्या वाटे
कोणतरी रडले.

रडण्याचा आवाज
कानी आला;
आतल्या आतुन
किंचाळत राहिला.

पाहिले त्याला
त्याने माझ्याकडे;
हसला तो
बघुन लोकांकडे.

त्याच्या हातावर
खिळे ठोकले;
त्याचे शरीर
स्क्रुवर लटकले.

घुमतो आवाज
चर्चमध्ये जाता;
व्याकुळतेने सांगतॉ
मला सोडा आता.

Thursday, May 29, 2008

आजीची ईच्छा.


कुठली कुठली नाती
तिने जपुन ठेवली?
विधवेच्या रुपात,सा-रांना
आनंद देऊन गेली.
कोणा कळाली?आयुष्यभर
नेसली एकचं साडी
तिच्या हातून सुटली
गुढ भविष्याची काडी.
कसली कसली वचन
कोणा दिली कळेना;
जाताना एकचं बोलली
दिवा काळजाचा पेटेना.
अशी कोणती भिती
मनात दडून राहिली?
तिची इच्छा,गंगेत
जाऊन तिला सोडली.

Monday, May 26, 2008

चिमणे चिमणे



चिमणे चिमणे
उडत ये;
भरले आंगण
टिपून घे.


चिमणे चिमणे
टिपून घे;
माझ्याशी नातं
जोडून घे.


चिमणे चिमणे
जोडून घे;
माझ्याशी थोड
खेळून घे.


चिमणे चिमणे
खेळून घे;
पुन्हा पुन्हा
अशीच ये.

आई गेली तेंव्हा...


आई गेली तेंव्हा...
त्यारात्री मी एकटा झालो
तोच चेहरा होता,तेचं रुप होतं
मला आठवतयं अजुन,
अंगावर क़ाटपदराची साडी,
हातात हिरव्या गच्च भरलेल्या बांगड्य़ा,
आणि कपाळाला कुंकू.
इतकच तिच्या अंगावर होतं
ओठावर एक स्मित हास्य दिसुन येत होतं.
२)
डोळ्यांत अश्रुचा एक थेंबही नव्हता माझ्या.
आईला उचलणारे चार खांदेही दिसत
दिसत नव्हते आजुबाजुला माझ्या.
घराच्या थोड्याचं अंतरावर स्मशान होतं.
पडवीतुन बाहेर बघितलं तर काळोख वाढतं चाललेला.
स्मशानाचा दरवाजा ही बंद होता.
३)
घरात दिवा पेटलेला होता
आईवर टाकायला माझ्या हातात
एक फुलही नव्हतं त्या रात्री.
पेटलेल्या दिव्यानेचं आईला
अग्नी द्यायला लागली मला.
४)
आईच्या प्रेताची राख
अजुनही तिथेचं आहे
जिथे मी तिला जाळली होती.
कधीतरी माझ्या डोळ्यांतुन पाणी
येइल आणि ति राख वाहून जाईल
असं मला वाटतं...कधीतरी!

Sunday, May 25, 2008

एक 'अर्थशून्य' कविता...



दिवेलागणीची वेळ
काळोखाने बघितले आत;
तिच्या वेदना
हळूहळू पहात.


वाटेची वळण
तशी तिची खंत;
तेवढ्यात आनंदाचा
झाला अंत.


पायात तिच्या
धुळीची पैजण;
एका आवाजाने
भरले आंगण.


केळीच्या पानाहून
कापरे अंग;
नाचताना ति
होते दंग.


अश्यावेळी
मोहरते रान;
तिला दिसते
विश्व लहान.

Saturday, May 17, 2008

काल रातीला



काल रातीला
भिजुन आले;
तुझ्याशी नाते
गहिरे झाले.


पावसात भिजुन
वस्त्र भिजले;
तुला पाहताना
गाली लाजले.


भिजल्या तनाला
तू पाहिले;
तुझ्या नजरेला
आवरु लागले.


तुझ्याजवळ
हळूचं आले;
घेतल्या मिठीत
स्तन चुरगळले.


मिठी सोडवताना
मिच हसले;
कालचं स्वतःला
असे पाहीले.

Wednesday, May 14, 2008

'आजन्म'


जुनेच घाव बघत बसलो
माझ्या वेदनांना मोजत राहिलो
कुठवर समजवू माझ्या मनाला?
येणारया व्याधींची वाट आतुरतेने
पहात बसलो...!
अता न बघीन मागे वळून
अता न काढीन अश्रु डोळ्यांतुन
हा माझा लांबचा प्रवास
माझ्या दुःखांचा मी हात धरीन...!
हात धरीन...!
जरी गळाले अश्रु काहीसे
वा अडखळले माझे पाय जरासे
आज मी एक वचन देतो
मि देईन साथ त्यांना आजन्म...!
आजन्म...!

'पहाटेची स्वप्नं'


पावसाळी पहाटे
उडली गीधाडे;
अदृष्याला सारे
कळो आले.
---------------
लाल मुंग्यांची
पसरलेली वारुळे;
अंगावर चढताना
चावे घेतले.
---------------
एका खोलीत
कोळ्याचे जाळे;
पाऊल टाकताचं
अडकून गेले.
---------------
आत रानात
दिसले नाग;
पाठ फिरवताचं
दंश केले.
----------------
अनोळखी प्रेतावर
टाकली फुले;
डोळ्यांतले नीर
काळे ओले.
-----------------
नवेलीच्या गर्भावर
पडले पाऊल;
आतले बाळ
रडून मेले.
------------------
आकाश बघताना
सुर्य सांगतो;
तुझे मरण
आताच आले.
-------------------
असे सारे
स्वप्नात आले;
डोळे उघडताचं
मिच भ्याले.

'म्हातारी'


आभाळाशी बोलताना
ओठांना हसू आले;
तिला पाहताचं
पावसाला रडू आले.
ति एकटीच उभी
काळोखाच्या नशेत;
पाऊस पिउन
दिसते पुन्हा आशेत.
तिच्या आधाराला
पावसाची मिळाली काठी;
कोण उभ दिसतयं
म्हातारीच्या पुढे पाठी?

Thursday, May 8, 2008

राधा-कृष्ण



कालिंदीचा काठ
कान्हाची झाली पहाट;
बासरी हातात घेताच
राधाने ऐकली हाक.


राधा ही अशी
धावे कान्हाच्या पाठीपाठी;
कान्हा हा कसा?
बासरी वाजवी कुणासाठी?


सांज ढळत आली
कान्हाची न थांबे बासरी;
सुरात रंगुन गेली
राधा नाचे त्यावरी.