Monday, June 30, 2008

"एक डाव"



आयुष्याचं चक्र फिरतचं जातयं

कधी थांबेल? कसं थांबेल?

माहित नाही....

त्या चक्रात अजुन एक चक्र

गुंतत चाललयं....

त्या मध्ये अजुन एक....

त्या मध्येही अजुन एक चक्र....

ह्या भोव-रात अडकुन सुध्दा

सा-रा गोष्टींचा अंत होत नाही.

कधी होईल?कोण करेल?

माहित नाही....

कधी कधी अश्या आयुष्यावर

एक डाव खेळावासा वाटतो

मरणाचा.....

स्वतःला मारण्याचा....

"जगण्यासाठी"



हि हिरवीगार झाडे,

दाट धुक पसरलेलं,

दवाचे पडणारे थेंब,

तळ्यात दिसणारे झाडाचे प्रतिबिंब...

दवानं ओली झालेली पायवाट,

ति कोकीळेची हाक...

सारं काही सुंदर

एका स्वप्ना सारखं दिसतयं.

कोणी एक व्यक्ती त्या स्वप्नात

एक कोपरा शोधतयं

जगण्यासाठी...!

"आकाशवेडी"


हे पसरलेलं निळं निळं आकाश....
त्यावर ता-रांची
पसरलेली चंदेरी चादर....
त्या चादरीला वाचवणारे
काळोखाचे एक कवचं.
आणि मि एक
त्या चंदेरी चादरीत
पंख पसरवून फिरणारी
आकाशवेडी....!

आक्रोश



काळोखात आला
रडण्याचा आवाज;
कोणी पाहिले?
पाणी सांडले केंव्हाच.


रडण्याची कळ
तिला सोसवेना;
पाणी गेले वाहून
त्यालाचं ते कळेना.


मनातला आक्रोश
न ऐकु येई त्याला;
तिच्या वेदना मी
वाहत जाताना पाहिल्या.

Sunday, June 29, 2008

"शब्द मनाचे"


कळले नाही जरी विचार माझे
थांबले होते कुठे बोलणे माझे!
दाखवले नाहीत अश्रु रडलेले माझे
सांगितले नाहीत अश्रु गळलेले माझे!
मी न सांगितली दुःखाची कथा
अश्रु नव्हते एवढे दिसण्यात माझे!
तुटल नातं मनाच ऐनवेळी
गळले अश्रु पुन्हः सुकलेले माझे!
बोललो भाषेत तुझ्या मी जरासा
कळले नाही तुला शब्द मनाचे माझे!

Friday, June 27, 2008

"थेंबाथेंबांच व्याज"


मोजु नकोस दुःख तुझी
ते मोजता मोजता वाढे;
नको गाळूस ही आसवं
पडताचं आयुष्यं सारे गाडे.
किती काळ गेला निघुन
हासणं तुझं कुठेयं गडे?
राहू नकोस अशी एकांतात
अश्रुंचेही टोचतात काटे.
तुझं मुरडणं,तुझं लाजणं
तुझा लळा सारेच आठवे;
कुठे गेलं तुझं सारं
शोधताना काळीजं माझे फाटे.
अशी कशी गं तु गडे?
तुला काहीच कसे नाकळे?
आसवांची मिळालेली मुद्दल तुला
माझ्याकडे थेंबाथेंबाने व्याज मागे.

Thursday, June 26, 2008

कधीकधी..


एकटाच शोधतो मला मी माझ्यात
हरवतो विश्वात स्वतःच्या मी कधीकधी
दिसतो लोकांना हसताना मी एकटा
लोकं वेडी,बघतात हा चेहरा कधीकधी
जपतो मनात माझा हुंदका
लपवीत आसवे रडतो मी कधीकधी
आयुष्यं चालतयं माझं हळु-हळु
वळुन पहातो गेलेले क्षण मी कधीकधी
जखमा बुजून गेल्या सारया तरी,
खपल्या काढीत हसतो मी कधीकधी

Wednesday, June 25, 2008

"आई निघाली माहेरा"


आई निघाली माहेरा
बांधुन पदराला गाठी;
ऐन आषाढात तिला
मिळाली अश्रुंची मिठी.
तिच्या मनात वाजते
पावसाळी रात्रीचे वादळं;
काळ्या रात्री रडते
अशी विचीत्र-व्याकुळ?
कशी उंबरा ओलांडते
सोसत सोसत कळ?
आईच्या गुढ वेदनेचा
मला लागेना तळ.
वेदनेच्या पुरात उभी
डोईवर लेकराचे ओझे;
रडता रडता माउलीचे
डोळे केवढेतरी भिजे.
पांढरा पदर, अश्रु
पुसुन झाला ओला;
दारी हलत राहिला
तिने लावलेला दिवा.
आई निघुन जाताच
विझला दारातला दिवा;
ति पुन्हा दिसेल
ह्या आशेवर मी उभा.

Sunday, June 22, 2008

कधी-कधी


कधी येतेस....कधी जातेस,
कधी लपतेस....कधी दिसतेस,
कधी रुसतेस....कधी हसतेस,
कधी बोलतेस....कधी थांबतेस...
एक सांगु का तुला?
" नको ना अश्या भरलेल्या
आभाळाची छेड काढुस"
मं कधी अचानकपणे बरसलं
तर मला नको सांगुस...

"तुझ्या कोसळण्याची"


एकेदिवशी तु बोलता बोलता
अचानकपणे अबोल झालीस,
तु आता बोलशील...तु आता बोलशील
ह्या आशेवर मी निवांत बसलो.
माफ कर...पणं,
हळूहळू तुझ्या मनातलं
आभाळं कधी भरलं ते मला कळलचं नाही.
मला आता खुप तहान लागलीय
वाट बघतोय तुझ्या कोसळण्याची....

हसत हसत....


त्या दिवशी तुझं प्रेम बघीतलं
मुसळधार पावसावर असलेलं प्रेम....
एकटक मुसळधार पावसाला पहात होतीस,
तुझ्या चेह-यावरचा आनंद
पहात होतो मी खुप वेळ.
मी अजुनही तिथेच उभा आहे
एका आशेवर....
कधीतरी वळून माझ्याकडे बघशील...
आणि तुझ्या आनंदात मी सामील होईल...
हसत हसत....

Friday, June 20, 2008

आई गेली तेव्हा - २


आई गेली तेव्हा
स्मशानात मी बि पेरूनी आलो,
उरल्या-सुरल्या राखेवर
धो-धो पावसासारखा मी बरसुनी गेलो,
बि पेरल्या मातीत
रात्रं-दिवस मी पाणी टाकतं राहिलो,
तेरा दिसांच्या झाडात
गेलेल्या आईला मी शोधत बसलो.

Sunday, June 15, 2008

तु अशीच आहेस...तु अशीच रहा



तु अशीच आहेस...तु अशीच रहा
आभाळाला टांगलेल्या झुल्यावर तु झुलत रहा...

घे हळूहळू झोके...घे थोडसं झुलून
बसल्या झुल्यावर सारखी तु हसत रहा...

मिळेल वा-याची साथ...देईल तुला वाट
झोका घेत घेत वा-रासंगे तु खेळत रहा...

असेल नसेल कुणीही...कूठेही तुझ्यासोबत
आकाशातल्या ता-रांसोबत तु बोलत रहा...

येईल अंगावर झडप...दिसलचं कधी वादळं
त्यांच्याशी अतुट नातं जोडून तु हसत रहा...

उंच-उंच झोके घेत...वादळी वारे सोसत
आनंद दुःखाशी मैत्री करत तु जगत रहा...

आहे तुझं आयुष्यं...दोन घट्ट गाठींवर
जिवनातला प्रत्येक क्षण तु लुटत रहा....

Friday, June 13, 2008

"चढणीचा घाट"


आला चढणीचा घाट
अंगावर रक्ताची साय
अंग अंग जाळीत
वाट फाटत जाय....
पुढल्या फाटल्या वाटेवर
काट्याची बाग हाय
वेचाताना काटे कसे
कुठे रक्ताळले पाय....?
कुठल्या एका पावलाने
वाट खुलत नाय
जिथे जाईन तेथे
वाट चुकीन काय....?

Wednesday, June 11, 2008

"जाळे"



पुढे चढणीचा घाट
आहे गर्भाआत वजन;
एकलाच अरुंद घाट
वाजते एक पैजण...


एकल्या झाडच्या शेजे
पांघरुण घे गोधडी;
चालता चालता होई
दुःख तुझी उघडी....


व्यथेची वेडी तु
पदराने पुशिले डोळे;
थोड थोड थांबून
बघ चढणाचे जाळे....

Thursday, June 5, 2008

"वादळमिठी"


तिचं उभं आयुष्यं
समुद्रात असलेल्या एका
बेटासारखं दिसतयं मला.
हजारो मैलाहून
येणारी वादळं...उंच उंच लाटा
बेधडक येऊन तिच्यावर आदळताहेत.
पणं, ति एकाच जागेवर स्तब्ध बसली आहे.
अचानक येणा-या वादळमिठीच्या प्रतिक्षेत.

"कोकीळा"


पहाटे पहाटे
कोकीळा गाते;
आतल्या आते
हालती पाने.
रानावनातून
सुरात न्हाते;
झाडाचे पान
हळूच पडते.
तिच्या आवाजाने
मन हालते;
तिला शोधताना
सांज ढळते.

Sunday, June 1, 2008

पेले


आतल्या विश्वाची
उघडी विराट दारे;
मनाच्या तुरुंगात
कोणी ठेवलेत पहारे?


पावसाळी पहाटेचे
मिळतात वेगळे ईशारे;
साकी बुडतोच आहे
पियुन काठोकाठ पेले.