Monday, March 23, 2009

चुकले मी


त्याचा अलगद हात
माझ्या शरीराचा गुंता
सोडवत असताना;
त्याचा हळूहळू बदलत
असलेला संदर्भ पाहून
मला भोगायला लागल्या
असह्य वेदना...
:
:
तेंव्हा कुठेतरी असं वाटू लागलं की,
आयुष्यात पहिल्यांदाच चुकले मी.
त्यापेक्षा केसांत गजरा, हातात बांगड्या,
ओठांवर भडक लिपस्टीक लावून
बसस्टॉपवर उभी राहिले असते
अन येण्या-रा जाणा-राला विचारलं असतं.
"आता है क्या? सिर्फ छेसौ रुपया.
निदान पैसेतरी कमवले असते.

आड


काळोखाच्या आत
घरा जात;
नको नको ते
दृश्य पहात.
:
:
ईथे-तिथे भासे
निराळा प्रकाश;
आत कुठेतरी खोल
जळतेयं लाश.
:
:
अश्या भलत्यावेळी
कोण होते दाराआड?
पहात पहात लपले
हळूचं काळजाच्या आड.

गर्भ


आतल्या अंधारात
चटावली नार;
खुले द्वार
झाले बघं.
ईथे-तिथे पसरले
प्रकाशाचे पाणी;
उतू गेले
विर्य बेईज्जत.
नको-नकोच आता
वाकून पाहू;
आत गर्भात
फक्त काळोख.

आई सांगते की


वर्षानुवर्षे उलटलीतः
मी वाट पहातोय आजीची.
आई सांगते की,
तू लहान असताना एकदा
आलेली तुझी आजी
काठी टेकत टेकत दारापाशी.
हो...हो...मला आठवतयं
आली होती एकदा आजी दारापाशी आणि
रागाने तशीच निघुन गेली.
मला अजुन एक आठवतयं की,
आजी गेली तेंव्हा
तिने आभाळाकडे पहात पहात हात जोडले होते.

पेन्शनर


सका-सकाळी आपली आवरा आवर करुन खिडकीतून बघणारा,
नेहमी ह्या लोकांच्या गर्दीत कुठेतरी हरवलेला असा;
कुठे जातात ही सारी लोकं ईतक्या घाई-घाईत? काय करतात?
असे काही प्रश्न मनालाचं विचारावेसे वाटतात.
:
:
काळाचं एक-एक पाऊलं पुढे पुढे टाकत, स्वतःलाच सावरत,
मोडलेल्या लाकडी जिन्याचा आधार घेत पुढे सरकताना....
त्याचा तोल जात असताना कोणीतरी संभाळेल असं वाटतं.
कुठेतरी आपल्याला पोचायचयं ह्या विचाराने पाऊलं उतरतं जातयं.
:
:
पुढे रस्त्याच्या कडेला उभं राहून इकडे-तिकडे पहात,
लोकांची भिड पाहून स्वतःचाच घाबरलेला चेहरा;
समोर उघड्यावर बसलेल्या नावीच्या आरश्यात पहायला मिळतो.
थोडी भिरभिरी येता, त्याचं मोडलेल्या जिन्याकडे पावलं वळतात.
:
:
एक-एक पाऊलं चढत असताना त्याच्या जिवाला झालेला त्रास...
आज खुप थकायला झालयं; आज खुप काम केलयं मी.
पुन्हा तिच खिडकी, तोच रस्ता,तेच मुशाफिर,तोच मोडलेला जिना
आणि त्याच सलूनच्या आरश्यात घाबरलेला चेहरा दिसतोय...एका पेन्शनरचा!

प्रखर शाप


जन्मानंतरची पहिली पाच सहा वर्षेः खेळाखेळात गेली,
लपाछपी, बाहुला-बाहुलींची लग्न, पत्यांचा बंगला, भातुकली ई.
नंतरची वर्षे नाते न जुळलेल्या अभ्यासात...जेमतेम मॅट्रिकची पायरी चढलो.
जिथे "कैद ए बामुशक्कद" ची सजा मिळाली.
:
:
काही वर्षांनंतर कविता भेटली; अधुनमधुन तिच्याशी बोलायचो,
तिला वाचायचो...एक दिवस अचानक झटका आला अन थेट तिला
कागदावर उतरवली; तेंव्हा पासुन एक प्रखर शाप मिळाला मला.
परिणामः नापासाचे अधुनमधुन अटळ वार्षिक शिक्के कपाळी म्हज्या.
:
:
शिक्षणाला राम राम ठोकला कायमचा अन वडिलांनी दिलेल्या कामाचा स्विकार केला;
काही काळ ओलांडल्यावर पुन्हा वडिलांच्या इच्छेने एका घरंदाज मुलीशी लग्न,
काम आणि लग्न ह्या दोन्हीं बाबतीत वडलांची इछा बलवत्तर.
:
:
तिशी उलटल्यावरः कौटुंबिक कटू अनुभव उदंड गवतासारखे वाढलेले
आणि मं त्यातुनच सुटकेचा श्वास घेण्यासाठी बेफिकीर असा मी भटकत फिरणारा;
त्या घुस्मटगार अंधारातुन बाहेर पडण्याकरिता सहचरिणीच्या सांगाताने
अपु-रा पैश्यात सुध्दा दुस-रा गावातल्या घरात प्रवेश; तोवर कविता मला पोसत होती.
:
:
गरुडगतीने वर्षे झेपावलीत...दिवसेंदिवस बायकोच्या दिसत असलेल्या आजाराच्या असह्य वेदना;
आयुष्याच्या विचित्र-व्याकुळ सावल्यांमध्ये जिवाला जगवताना मारताना...
कवितेचा भक्कम आधार माझ्या पाठीशी होता...;
आधार म्हणण्यापेक्षा कवितेचा प्रखर शापच माझ्या मागे होता.

Friday, March 20, 2009

पतिव्रता


एकदा माझे स्त्रीत्वाचे आदर्श
माझ्याचं शब्दांनी पेटवले;
तेंव्हा आजुबाजूच्या काही पतिव्रता
भडकून घरी आल्या...
:
:
त्यापैकी दोघी तिघींनी माझ्याचं
मुस्काटात दोन हात ठेऊन दिले;
आणि मला एका खुर्चित बसवून
माझे हात-पाय बांधून टाकले.
:
:
पुन्हा सा-रा जणी आपापल्या
घरी जाऊन आपापल्या नव-रांना
धुवूनपुसून त्यांची पुजा करुन
सा-रांना देव्हा-रात स्थान दिले.
:
:
त्यांच्या या आरत्यांत आणि
घंटानादात माझे शब्द
गुदमरुन गेले...
:
:
तेंव्हा रात्रीचे अडीज वाजले होते!