Sunday, October 19, 2008

"बाहुला - बाहुली"


हा आपला खेळ
बाहुला बाहुलीचा;
दे तुझी बाहुली मला
घे माझा बाहुला तुला.
आपल्या या खेळाखेळात
कसं सजवूया स्वप्नं?
तुझ्या-माझ्या हाती उरेल
फक्त दोघांच लग्न.
तुझ्या बाहुलीला भिती
कोण येईल लग्नात?
माझा बाहुला सांगतो
मी साथ देईन फे-यात.
बाहुला बाहुलीच्या लग्नाचा
कसा सजवूया मांडव?
त्या दोघांनाही आपणं
एकाचं गाठीत बांधाव.
लग्न लग्न खेळता
पुरा कोसळला मांडव;
कोसळल्या ढिगाखालच्या
चुर स्वप्नांना सांगाव...
आता वेळ आली बिदाईची
तशी रडली बाहुली;
बाहुलीने तुझ्याकडे पाहिलं
अन डोळे पुसतं राहिली.
बाहुला बाहुलीच्या या खेळात
स्वप्न चुर चुर झाली;
तु संभाळ तुझा बाहुला
मी जपेन माझी बाहुली.

Wednesday, September 17, 2008

"जुगारी"


रात्रीच्या काळ्याकुट्ट अशा अंधारात,
एका पंचविस वोल्टच्या बल्बच्या अंधूक प्रकाशात;
आपण सारे असावध जुगारी मधोमध आणि
आजूबाजूला उभी असलेली मुशाफिरांची गर्दी.
येत जात असलेली, अधून मधून...
हातांत विस्कटलेले पत्ते.उलटेसुलटे...
तिन कॅटला कत्री मारुन मारुन,
हाताच्या बोटांना झालेली वेदना काही वेगळीच होती.
तेंच पत्ते काळाच्या कर्मठ टेबलावर सा-रांना वाटताना,
आज भरपूर पैसे कमवण्याच्या आनंदात मी.
हळू हळू डाव पुढे सरकत असताना...
माझं उदास झालेलं मन, बाकिच्या जुगा-रांना बघून;
सर्वांच्या हातांत जोडलेले पत्ते पाहून,
माझ्या मनात नकोनकोत्या प्रश्नांच वादळं उठत होतं.
तेंव्हाच मला आस-रासाठी मिळालं एक नवं पान.
जस जसे पुढचे जुगारी खेळत राहिले,
मला कळालं नाही; मी माझ्या प्रश्नांमध्ये हरवलेलो कुठे?

Wednesday, September 10, 2008

" भातुकली"


तसं तुझं आयुष्यःमला नाकळल्यासारखे...
लहाणपणीच्या भातुकलीच्या खेळाची बाहुली अजूनही जपणारी;
तेंव्हा कुठे आठ्वू लागतात भातुकलीच्या खेळाचे दिवस्
खेळाखेळात बाहुलीला रडताना पाहिल्यावर, तु तिचे अलगद डोळे पुसणारी.


ये माझ्या सोबत खेळायला...ये माझ्यासोबत...असं तु मला नेहमीच सांगायचीस
पणं, मी आपल्याच मस्तीत मस्त;सा-रा जगाचा विसर पडल्यासारखा असा,
तरीसुद्धा तुझा आपला एक घराचा कोपरा ठरलेला खेळायसाठी,आठवतयं अजून मला
खेळायला बाहुलीला सांगणारी तू एकचं..."माझ्यासोबत खेळ""माझ्यासोबत खेळ"...


मी आपला दुरुनच तुझी मज्जा बघतं;अन तुझी मस्करी करत उभा
तसे तुझे पाणावलेले डोळे अन हातात बाहुलीला घट्ट धरुन,
तुझ्या लांबलचक फ्रॉक ने डोळे पुसत तु निघुन जायचीस...
प्रत्येक वेळी हे असचं होणार आपल्यात,हे तुला ठाऊक होत.


फार फार दिवसांनंतर तु पुन्हा बाहुलीला घेऊन,खेळायला माझ्यादारात
मी ही अजून तसाच....तुझ्याकडे बोट दाखऊन मुद्दाम हसणारा;
आलीस आणि माझ्या हातत तु बाहुली देऊन गेलीस...
मी दारावरच उभा एकटा...एकाकी...दूर,काही उत्तरांना शोधत.

Sunday, August 24, 2008

"सीक्वेन्स"



माझे आयुष्यं तसे एका रमीच्या डावासारखं आहे,
जिवनातली तेरा बर्षेःजशी तेरा पानं वाटलेली स्वतःहून स्वतःला;
उरली फक्त एकेचाळीस वर्षेःएकेचाळीस पानांसारखी,खाली राहिलेली
त्यातही दोन जोकर आहेतच कुठेतरी पत्यांमध्ये लपलेले.


एखादं पानं उचलून जुळवावं म्हटलं तरं...
नेमकं तेचं उचललेलं पान दगा देऊन जात समोरून,
जसं आयुष्यातं एक वर्ष रडवून जातं ना तसचं काहितरी
परत पुन्हा वाट बघत राहतात हातातली तेरा पानं...पुढल्या पानाची.


खुप त्वेष येतो,जेव्हां उचललेलं एक एक पान जुळत नाही
ती वेळचं तशी असते...जसं एखादं वर्ष आयुष्याशी जुळत नाही,
जेंव्हा खाली राहिलेली पानं हातातल्या पानांशी जुळत नाहीत...
त्यावेळी वाट पहावी लागते एका जोकरची...भेटेलचं कधीतरी तो.


मी वाट बघतोय केव्हांपासुन सीक्वेन्स जुळायची,
फारचं क्वचित जुळतात सीक्वेन्स हे मला माहित आहे;
कधीपासुन अडून बसलोय एका पानासाठी(उदाःबदाम राणी)
कधीतरी अचानक भेटेल ती आणी सीक्वेन्स पुर्ण होईलचं.

Friday, August 22, 2008

"तिचं आभाळभर दुःख"


दार अर्धे लोटलेले दिसलेः
दाराआड लपलेली तु; स्वतःला लपवत,अंधाराच्या पलिकडे
तू अवचित समोर येतेस, नग्नावस्थेत असून...
तेंव्हा तुझी अवस्था पाहुन कोणाला तरी जाग येते.
तुझ्या स्तनांवरुन खाली आलेल्या मोकळ्या कुंतला,
अन तसे तुझे दोन्ही हात योनीला झाकलेले;
तरिही, स्वतःला झाकण्याच्या पुर्ण प्रयत्नात...तिरकस उभी तू
कुशिवर असलेल्या लाल भडक खुणा मला दिसणारचं.
थांब...थांब...अशी एकाएकी पाठ नको दाखवू मला
तुझे नितंब झाकण्यासाठी तुझ्याकडे काहीचं नाही आहे;
हे तुला माहित होत, तरीसुध्दा तू दार बंद करुन घेतलेस
तेंव्हा तिचं आभाळभर दःखं माझ्या डोळ्यांत मनात मावलं नाही.

"काठी"


नावेतुन उठता खाली
मागे राहिला गाव;
कोठे आलो आकळेना
माझी सुटली नाव.


पुढे सुक्या वाळूचे ढिग
नसो चलण्याला अंत;
पायाखाली आभाळाच्या सावल्या
कुठल्या दिसे जिवंत?


चालता चालता पाउलं
ढिल्या वाळूत रुतत जाते;
तेंव्हा, माझे थकलेले आयुष्यं
काठी टेकत चालते.

Friday, August 15, 2008

"नवा अर्थ"


अर्ध्या झोपेत आईच्या
बाळं रडण्याचा आवाज;
तशी तिला आली
थोडीशी झोपेत जाग.
तिच्या स्तनांना हळूचं
मऊ ओठांचा स्पर्श;
रात्रीच्या गूढ तंद्रित
आईच्या दुधाला नवा अर्थ...
बाळं निजून गेलं, अन्
हालली जराशी माय;
बाळाच्या ओठी आली
रात्रीच्या दुधाची साय.