
पहाट झाली
रात्र झोपली
चंद्र उपाशी
पक्षी आकाशी
उन्हं तापली
वादळं सुटली
पाने गळाली
माणसे पळाली
सांज खुलली
वादळं थांबली
किरणं निजली
सावली दिसली
नाही म्हणाली
दृष्टी झोपली
वाट चुकली
सावली निघाली.
झुंज माझी आयुष्याशी, खेळतो मी माझ्या स्वप्नांशी, नेहमीच सोसतो दुःख तरी, वाट पहातो एका आनंदी क्षणाची.

