Friday, October 12, 2007

तू एक माणूस आहेस...




ए...ए थांबना थोडावेळ...थांबना...!

बोल ना माझ्याशी थोडसं...

असा जाउ नकोस चेहरा लपवून आज.

नेहमीच शांत शांत असतोस...

काहीतरी बोल ना माझ्याशी आज...

ए...ए थांबना थोडावेळ...थांबना.

मि विचारल तु आहेस तरी कोण मला विचारणारी?

तिने उलट उत्तर दिलं मला...

तू एक माणूस आहेस...एक माणूस.

(कल्पेश फोंडेकर)

Thursday, October 11, 2007

खरचं आवडतं मला...



आवडत मला...

सायंकाळी समुद्र किनारी फ़िरायला
ओल्या वाळू वर अलगदपणे
पावलं टाकायला....


खुप मज्जा येते त्या
ओल्या वाळूला उघड्या
पायांनी स्पर्श करायला....


आवडत मला...

त्याच वाळूवर काही क्षण
निवांत बसुन त्या मावळत्या
सुर्याकडे एकटक बघत बसायला...

आवडत मला ...

त्या समद्रात बुडणारया
सुर्याकडे पहात पहात
गेलेले दिवस आठवत बसायला...

आवडत मला...

बुडलेल्या सुर्याला
पाहता पाहता
ऊद्या च्या नविन
किरणांची वाट पाहायला....

खरचं आवडतं मला...

(कल्पेश फोंडेकर)

Monday, October 8, 2007

जगण्याचा खेळ पुरे....



दुःखांचा थांबव प्रवास तुझा
सांगतो एक एक मज अश्रु अता


मी उन्हात चाललो नेहमी
सावलीचा नको मज आधार अता


दुःखाचा बाजार पाहिला सर्वत्र
सुखाचा नको सांगु मज भाव अता


एक एक घोट पिउन आसवांचा
त्या अश्रुंचा कर्जबाजारी झालो अता


जगण्याचा खेळ पुरे झाला तुझा
सांगतो एक एक श्वास मज अता


(कल्पेश फोंडेकर)

Sunday, September 23, 2007

हसण्यातले दुःख...




हसण्यातले दुःख 'मला' कळतं आहे!
हसताना मात्र मनं माझं रडतं आहे!


कसा शोधू मी एक एक किरण?
डोळ्यांवर अंधाराचे एक कवच आहे!


देणारयांचे उपकार कसे फेडू?
जिव श्वासांचा कितीसा उरला आहे!


सोडतो हे शरीर, त्याचे दुःख कैसे?
कुठला जिव ईथे अमर दिसतं आहे!


(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, September 11, 2007

अश्रु दाखवायला ...




भेटलेच तुला कधी स्वप्नात...
हसशील का परत बघून आनंदात पुन्हा?


जोडशील पुन्हा तुटलेले धागेही...
जोडल्या जागी गाठी राहतील का पुन्हा?


दिसला न तु प्रत्यक्ष।त मला...
म ह्या डोळ्यांना तुझी आस का पुन्हा?


तु वेळ जरा दे सावरायास मला...
मग करशील का रे परत बरबाद पुन्हा?


बांधुन वचनात माझ्या एकट्या जिवाला...
शपथा का घालतोस स्वतःच्या जिवाला पुन्हा?


आशेचे किरण होते मावळले...
म स्वप्नांचा हा छळवाद कशाला पुन्हा?


बघीतलेस कधी ह्या जिवाला जळताना...
अश्रु दाखवायला भेटशील का रे स्वप्नात पुन्हा?


(कल्पेश फोंडेकर)

Tuesday, September 4, 2007

सत्य मी दाखऊ कसा?





तो मरणाचा क्षण मी टाळु कसा?
अन् येणारया मरणाला मी बघु कसा?


दिसत होते मरण डोळ्यांत जिवाचे
क्षणापुर्वीच्या मरणाला मी थांबवु कसा?


सारेच दिसत होते बाटलेले
त्या जमावाला एकत्र करु कसा?


दिसत होती लोकं सारी रडताना
त्या शवाला सत्य मी दाखऊ कसा?


(कल्पेश फोंडेकर)

Monday, September 3, 2007

मला काहीच आठवेना....



पहाटे पहाटे माझी निंद थोडी खुलली
तुझी रेशीम मिठी मात्र सैल होईना


मला न कळेना...तुला न कळेना...
तुझा पदर मात्र तुला न सावरेना


रात्र गेली सरुन एकमेकांच्या मिठीत
तरीही,तुझ्या ओठांची लाली मला पुरे पडेना


तु चाललीस निघुन दबक्या पावलांनी
पणं,तुझा हात माझ्या हातुन काही सुटेना


गडे..दिलेस लाख बहाणे मला रात्रीचे
तुझ्या ओठांचे शब्द मला काहीच आठवेना.


(कल्पेश फोंडेकर)