Wednesday, May 14, 2008

'पहाटेची स्वप्नं'


पावसाळी पहाटे
उडली गीधाडे;
अदृष्याला सारे
कळो आले.
---------------
लाल मुंग्यांची
पसरलेली वारुळे;
अंगावर चढताना
चावे घेतले.
---------------
एका खोलीत
कोळ्याचे जाळे;
पाऊल टाकताचं
अडकून गेले.
---------------
आत रानात
दिसले नाग;
पाठ फिरवताचं
दंश केले.
----------------
अनोळखी प्रेतावर
टाकली फुले;
डोळ्यांतले नीर
काळे ओले.
-----------------
नवेलीच्या गर्भावर
पडले पाऊल;
आतले बाळ
रडून मेले.
------------------
आकाश बघताना
सुर्य सांगतो;
तुझे मरण
आताच आले.
-------------------
असे सारे
स्वप्नात आले;
डोळे उघडताचं
मिच भ्याले.

No comments: