Monday, May 26, 2008

आई गेली तेंव्हा...


आई गेली तेंव्हा...
त्यारात्री मी एकटा झालो
तोच चेहरा होता,तेचं रुप होतं
मला आठवतयं अजुन,
अंगावर क़ाटपदराची साडी,
हातात हिरव्या गच्च भरलेल्या बांगड्य़ा,
आणि कपाळाला कुंकू.
इतकच तिच्या अंगावर होतं
ओठावर एक स्मित हास्य दिसुन येत होतं.
२)
डोळ्यांत अश्रुचा एक थेंबही नव्हता माझ्या.
आईला उचलणारे चार खांदेही दिसत
दिसत नव्हते आजुबाजुला माझ्या.
घराच्या थोड्याचं अंतरावर स्मशान होतं.
पडवीतुन बाहेर बघितलं तर काळोख वाढतं चाललेला.
स्मशानाचा दरवाजा ही बंद होता.
३)
घरात दिवा पेटलेला होता
आईवर टाकायला माझ्या हातात
एक फुलही नव्हतं त्या रात्री.
पेटलेल्या दिव्यानेचं आईला
अग्नी द्यायला लागली मला.
४)
आईच्या प्रेताची राख
अजुनही तिथेचं आहे
जिथे मी तिला जाळली होती.
कधीतरी माझ्या डोळ्यांतुन पाणी
येइल आणि ति राख वाहून जाईल
असं मला वाटतं...कधीतरी!

No comments: