Monday, June 30, 2008

"एक डाव"



आयुष्याचं चक्र फिरतचं जातयं

कधी थांबेल? कसं थांबेल?

माहित नाही....

त्या चक्रात अजुन एक चक्र

गुंतत चाललयं....

त्या मध्ये अजुन एक....

त्या मध्येही अजुन एक चक्र....

ह्या भोव-रात अडकुन सुध्दा

सा-रा गोष्टींचा अंत होत नाही.

कधी होईल?कोण करेल?

माहित नाही....

कधी कधी अश्या आयुष्यावर

एक डाव खेळावासा वाटतो

मरणाचा.....

स्वतःला मारण्याचा....

"जगण्यासाठी"



हि हिरवीगार झाडे,

दाट धुक पसरलेलं,

दवाचे पडणारे थेंब,

तळ्यात दिसणारे झाडाचे प्रतिबिंब...

दवानं ओली झालेली पायवाट,

ति कोकीळेची हाक...

सारं काही सुंदर

एका स्वप्ना सारखं दिसतयं.

कोणी एक व्यक्ती त्या स्वप्नात

एक कोपरा शोधतयं

जगण्यासाठी...!

"आकाशवेडी"


हे पसरलेलं निळं निळं आकाश....
त्यावर ता-रांची
पसरलेली चंदेरी चादर....
त्या चादरीला वाचवणारे
काळोखाचे एक कवचं.
आणि मि एक
त्या चंदेरी चादरीत
पंख पसरवून फिरणारी
आकाशवेडी....!

आक्रोश



काळोखात आला
रडण्याचा आवाज;
कोणी पाहिले?
पाणी सांडले केंव्हाच.


रडण्याची कळ
तिला सोसवेना;
पाणी गेले वाहून
त्यालाचं ते कळेना.


मनातला आक्रोश
न ऐकु येई त्याला;
तिच्या वेदना मी
वाहत जाताना पाहिल्या.

Sunday, June 29, 2008

"शब्द मनाचे"


कळले नाही जरी विचार माझे
थांबले होते कुठे बोलणे माझे!
दाखवले नाहीत अश्रु रडलेले माझे
सांगितले नाहीत अश्रु गळलेले माझे!
मी न सांगितली दुःखाची कथा
अश्रु नव्हते एवढे दिसण्यात माझे!
तुटल नातं मनाच ऐनवेळी
गळले अश्रु पुन्हः सुकलेले माझे!
बोललो भाषेत तुझ्या मी जरासा
कळले नाही तुला शब्द मनाचे माझे!

Friday, June 27, 2008

"थेंबाथेंबांच व्याज"


मोजु नकोस दुःख तुझी
ते मोजता मोजता वाढे;
नको गाळूस ही आसवं
पडताचं आयुष्यं सारे गाडे.
किती काळ गेला निघुन
हासणं तुझं कुठेयं गडे?
राहू नकोस अशी एकांतात
अश्रुंचेही टोचतात काटे.
तुझं मुरडणं,तुझं लाजणं
तुझा लळा सारेच आठवे;
कुठे गेलं तुझं सारं
शोधताना काळीजं माझे फाटे.
अशी कशी गं तु गडे?
तुला काहीच कसे नाकळे?
आसवांची मिळालेली मुद्दल तुला
माझ्याकडे थेंबाथेंबाने व्याज मागे.

Thursday, June 26, 2008

कधीकधी..


एकटाच शोधतो मला मी माझ्यात
हरवतो विश्वात स्वतःच्या मी कधीकधी
दिसतो लोकांना हसताना मी एकटा
लोकं वेडी,बघतात हा चेहरा कधीकधी
जपतो मनात माझा हुंदका
लपवीत आसवे रडतो मी कधीकधी
आयुष्यं चालतयं माझं हळु-हळु
वळुन पहातो गेलेले क्षण मी कधीकधी
जखमा बुजून गेल्या सारया तरी,
खपल्या काढीत हसतो मी कधीकधी