Sunday, June 29, 2008

"शब्द मनाचे"


कळले नाही जरी विचार माझे
थांबले होते कुठे बोलणे माझे!
दाखवले नाहीत अश्रु रडलेले माझे
सांगितले नाहीत अश्रु गळलेले माझे!
मी न सांगितली दुःखाची कथा
अश्रु नव्हते एवढे दिसण्यात माझे!
तुटल नातं मनाच ऐनवेळी
गळले अश्रु पुन्हः सुकलेले माझे!
बोललो भाषेत तुझ्या मी जरासा
कळले नाही तुला शब्द मनाचे माझे!

Friday, June 27, 2008

"थेंबाथेंबांच व्याज"


मोजु नकोस दुःख तुझी
ते मोजता मोजता वाढे;
नको गाळूस ही आसवं
पडताचं आयुष्यं सारे गाडे.
किती काळ गेला निघुन
हासणं तुझं कुठेयं गडे?
राहू नकोस अशी एकांतात
अश्रुंचेही टोचतात काटे.
तुझं मुरडणं,तुझं लाजणं
तुझा लळा सारेच आठवे;
कुठे गेलं तुझं सारं
शोधताना काळीजं माझे फाटे.
अशी कशी गं तु गडे?
तुला काहीच कसे नाकळे?
आसवांची मिळालेली मुद्दल तुला
माझ्याकडे थेंबाथेंबाने व्याज मागे.

Thursday, June 26, 2008

कधीकधी..


एकटाच शोधतो मला मी माझ्यात
हरवतो विश्वात स्वतःच्या मी कधीकधी
दिसतो लोकांना हसताना मी एकटा
लोकं वेडी,बघतात हा चेहरा कधीकधी
जपतो मनात माझा हुंदका
लपवीत आसवे रडतो मी कधीकधी
आयुष्यं चालतयं माझं हळु-हळु
वळुन पहातो गेलेले क्षण मी कधीकधी
जखमा बुजून गेल्या सारया तरी,
खपल्या काढीत हसतो मी कधीकधी

Wednesday, June 25, 2008

"आई निघाली माहेरा"


आई निघाली माहेरा
बांधुन पदराला गाठी;
ऐन आषाढात तिला
मिळाली अश्रुंची मिठी.
तिच्या मनात वाजते
पावसाळी रात्रीचे वादळं;
काळ्या रात्री रडते
अशी विचीत्र-व्याकुळ?
कशी उंबरा ओलांडते
सोसत सोसत कळ?
आईच्या गुढ वेदनेचा
मला लागेना तळ.
वेदनेच्या पुरात उभी
डोईवर लेकराचे ओझे;
रडता रडता माउलीचे
डोळे केवढेतरी भिजे.
पांढरा पदर, अश्रु
पुसुन झाला ओला;
दारी हलत राहिला
तिने लावलेला दिवा.
आई निघुन जाताच
विझला दारातला दिवा;
ति पुन्हा दिसेल
ह्या आशेवर मी उभा.

Sunday, June 22, 2008

कधी-कधी


कधी येतेस....कधी जातेस,
कधी लपतेस....कधी दिसतेस,
कधी रुसतेस....कधी हसतेस,
कधी बोलतेस....कधी थांबतेस...
एक सांगु का तुला?
" नको ना अश्या भरलेल्या
आभाळाची छेड काढुस"
मं कधी अचानकपणे बरसलं
तर मला नको सांगुस...

"तुझ्या कोसळण्याची"


एकेदिवशी तु बोलता बोलता
अचानकपणे अबोल झालीस,
तु आता बोलशील...तु आता बोलशील
ह्या आशेवर मी निवांत बसलो.
माफ कर...पणं,
हळूहळू तुझ्या मनातलं
आभाळं कधी भरलं ते मला कळलचं नाही.
मला आता खुप तहान लागलीय
वाट बघतोय तुझ्या कोसळण्याची....

हसत हसत....


त्या दिवशी तुझं प्रेम बघीतलं
मुसळधार पावसावर असलेलं प्रेम....
एकटक मुसळधार पावसाला पहात होतीस,
तुझ्या चेह-यावरचा आनंद
पहात होतो मी खुप वेळ.
मी अजुनही तिथेच उभा आहे
एका आशेवर....
कधीतरी वळून माझ्याकडे बघशील...
आणि तुझ्या आनंदात मी सामील होईल...
हसत हसत....