Tuesday, April 8, 2008

"मुर्ति"



घर सजवता सजवता

घराच्या ग्रहप्रवेशासाठी

फुलं घेवून येते

असं बोलून गेली...

काही वेळाने दबक्या

पावलांनी

ति घराकडे आली.

तेंव्हा पासुन मी माझ्या

घरात एक नग्न मुर्ति

फुलांनी सजवून ठेवली आहे!

Sunday, April 6, 2008

"वेष्यांच्या वरातीत"

वेष्यांच्या वरातीत
पुरुषांचा नाच;
हिजडे नाचणारचं
त्यात कसली लाज.


पुरुषाची जात
त्याचे वेगळेचं हात;
करुन पापं पुन्हा
हिजडे दाखवणारं दात.


कसले हे पुरुष
ज्यांना नाही कात;
रात रात जागुन
शेवटी स्त्रीयांनाच खात.

Saturday, April 5, 2008

"वासना"



तिच्या कुवार अंगाला
पिवळा गर्द रंग;
येते हाक दुरुन
राह नको अशी मग्न.


अंग तुझे हळदीचे
त्याला वेगळाच गंध;
कोण बघतयं तुला
वासनेने,उभी तंग.


हि वेळ व्यथेची
करेल तुला नग्न;
कोणी एक येउन
फाडेल तुझे अंग.

"हे राम हे राम"


दिवसा स्वतःला "साधु" समजतो
रात्रीचा मात्र वेष्येसोबत झोपतो
सिगरेट,दारु,अफिमची नशा करतो
लोकांना मात्र पुण्याचा मार्ग दाखवतो
दिवसा राम राम बोलतो
रात्र झाली कि रांड रांड शोधतो
रांडेला रात्रीचा रडवतो अन्,
पुन्हा पहाटे हे राम हे राम बोलतो

"मधुमेह"



एकदा म्हणतो मला साखर द्या
पुन्हा बोलतो मला खाऊ द्या
का विचारतो प्रश्न असे स्वतःला
वेळ सांगते तु मारुन खा.दुस-राला


घे जगुन तू,दिल्ली अजुन दुर
घे चाखुन तू,विष गोड खुप
नको अडवू स्वतःच्या हाताला तू
मधुमेह म्हणतो मरत मरत जगू

Thursday, April 3, 2008

**आई**



रात्रीच्या कुशीत निजताना
आईची आठवण येते;
पापण्या बंद करताचं
पाण्याला जाग येते.


हातावर डोक ठेवताना
ओठांवर अंगाई येते;
बाळा जो जो बोलताचं
हळूच गायी गायी येते.


रात्र हि सरताना
काळजाची वात होते;
आईची आठवण येताचं
डोळ्यांना जाग येते.

Wednesday, April 2, 2008

उध्वस्त किनारा.


या उध्वस्त किना-रावर
सगळीकडे माझ्या पावलांचे ठ्से
वाळूत अडकुन पडले आहेत
आता त्यांना मुक्त करायचयं
पणं इतका वेळ कुठे आहे?
सागराला भरती येतेय...