Tuesday, February 5, 2008

आकाश ते मालवून गेले...



मोठे तारे तरं कधीचं तुटून गेले
छोटे तारे सारे प्रकाश देऊन गेले!
काळोख प्रकाशाच्या या युध्दात
हे सारे आकाश कधीच थकुन गेले...

----------------------------------------------

चमकणारे सारेच तारे हरुन गेले
का दशा ह्या विश्वाची ते करुन गेले!
कुठे भेटतील अता ते तुटलेले तारे?
जाताना हे सारे आकाश ते मालवून गेले...

Monday, February 4, 2008

घरातल्या पलंगावर बसुन...




ति एक व्यक्ती


मनाने बाळ असलेली...


त्या व्यक्तीला हे जग


नकोस झालयं अता...!


कधीकधी आयुष्यं जगताना


विचार करते...


"का नाही मला लहान


राहू दिलं इथल्या लोकांनी?"


पणं,अता मरणाच्या दारात


उभी असताना येणा-या


प्रत्येक नविन गिराईकाची


आतुरतेने वाट पहाते,


घरातल्या पलंगावर बसुन...

Saturday, February 2, 2008

कवितांच्या युध्दाची...

(१)
अता नको भिक
कुणा आपल्याची
अता खरी गरज
आहे स्वबळाची...
(२)
अता नाही वाटत
भिती हरण्याची
अता आहे एकच
जिद्द जिंकण्याची...
(३)
अता हातात घेतली
तलवार शब्दांची
अता नाही पर्वा
कुणाच्या हृदयाची...
(४)
अता मेली भिती
शत्रुंच्या वाराची
अता वेळ आली
आपल्यांशी लढ़ण्याची...
(५)
अता करुया तयारी
शब्दांच्या वाराची
अता वेळ आली
कवितांच्या युध्दाची...

कोसळली पहा ईथली वास्तू...


शोधतो आम्ही एक एक वस्तू
कोसळली पहा ईथली वास्तू
कोण परतेल परत ह्या ठिक़ाणी?
नाही दिसतं कोण ईथे परंतू....
वाटतो हा ओसाड गाव सारा
आनंद हा लुटून गेला वारा
किती किती अडवले वा-राला
वादळं घेउन गेला सारा पसारा...
नको अता हा उदास निवारा
ढळला कधीच मुख्य तारा
कुठे सापडेल आज ईथे
शब्दांना मिळणारा एक सहारा...?

Tuesday, January 29, 2008

झोंबतो हा गार वारा अंगाला...


झोंबतो हा गार वारा अंगाला
मिठीत घेणारा नाही कुणी भेटला,
किती,कशी,कुठे दर्वळू आणखी?
ह्या फुलाला जपणारा नाही कुणी दिसला,
हि कशी स्वप्न डोळ्यांत माझ्या सजली?
माझी स्वप्न पहाणारा नाही कुणी मिळाला,
अता कशी आवरु स्वतःला मि?
मला लाजवणारा नाही कुणी हसला.

Monday, January 28, 2008

शोधीत आपल्या सखीचे.



पहाते वाट कुणाची?
पाय वळती तळाशी
अंधारात घुमते एक
वाट पाहुन आशेची


घेऊनी पदरी दुःख
पहाते गुढ उदासी
नाही कोणी सांगाया
विचारु आज कोणासी?


रान रान भटकली
सांगत शब्द दुःखाचे
पाय हे नशेत वळती
शोधीत आपल्या सखीचे.

Saturday, January 26, 2008

घुंगरु विचारतात.......



घुंगरु विचारतात कुठे आहे

आज मैफिल सजलेली?

-तिच्या घुंगरुंना अता

सवय झाली आहे

वाह...वाह...ऐकायची!

कुठे आहेत माणसे नोटा

फेकणारी...?

कुठे आहे ति दारु जमिनीवर

सांडलेली...?

हे सारे प्रश्न घुंगरू विचारत

आहेत...एका तवायफला!

नं माणसे,न सजलेला कोठा,

नं सुर,नं ताल...काहीच

नाही समोर...

आकाशाकडे बघुन नाचणारी

ति एकटीचं होती...