Wednesday, August 1, 2007

गेलं वाहून आसवातं...




काय सांगुन फ़ायदा ह्या शरीराच्या यातना
या मनातल्या आठवणी कुठेच नाही जातना


त्या आठवणींत, जगण्याची काय मजा
ज्या आठवणींत मिळते, जळण्याची सजा


नको कऱुस आनंद, ह्या दोन दिवसांचा
त्या आनंदातही, असेल एक क्षण दुःखाचा


आयुष्यात जगशील, कधीतरी त्या सुखात
पणं हे मनं वेळोवेळी, रडवी तुला दुःखात


कोणास दाखवशील ही यातना आयुष्यातं?
ईथे तरं तुझं सारचं गेलं वाहून आसवातं...


(कल्पेश फ़ोंडेकर)

2 comments:

Sonal said...

तुमच्या कविता वाचल्या. खुप छान आहेत.
तुमचा ब्लॉग असाच ब्लॉग्जमधून भटकताना कोणाला तरी दिलेल्या कॉमेंटमधून सापडला. अधांतरी उत्तर असलं तरी खरं आहे. :-)

Sonal said...

माझं ऑर्कुटवर अकाउंट नाहीये. होतं आधी पण नंतर डिलिट केलं. नॉट मच इंटरेस्टेड इन ऑर्कूट. :-) सॉरी!