Wednesday, September 10, 2008

" भातुकली"


तसं तुझं आयुष्यःमला नाकळल्यासारखे...
लहाणपणीच्या भातुकलीच्या खेळाची बाहुली अजूनही जपणारी;
तेंव्हा कुठे आठ्वू लागतात भातुकलीच्या खेळाचे दिवस्
खेळाखेळात बाहुलीला रडताना पाहिल्यावर, तु तिचे अलगद डोळे पुसणारी.


ये माझ्या सोबत खेळायला...ये माझ्यासोबत...असं तु मला नेहमीच सांगायचीस
पणं, मी आपल्याच मस्तीत मस्त;सा-रा जगाचा विसर पडल्यासारखा असा,
तरीसुद्धा तुझा आपला एक घराचा कोपरा ठरलेला खेळायसाठी,आठवतयं अजून मला
खेळायला बाहुलीला सांगणारी तू एकचं..."माझ्यासोबत खेळ""माझ्यासोबत खेळ"...


मी आपला दुरुनच तुझी मज्जा बघतं;अन तुझी मस्करी करत उभा
तसे तुझे पाणावलेले डोळे अन हातात बाहुलीला घट्ट धरुन,
तुझ्या लांबलचक फ्रॉक ने डोळे पुसत तु निघुन जायचीस...
प्रत्येक वेळी हे असचं होणार आपल्यात,हे तुला ठाऊक होत.


फार फार दिवसांनंतर तु पुन्हा बाहुलीला घेऊन,खेळायला माझ्यादारात
मी ही अजून तसाच....तुझ्याकडे बोट दाखऊन मुद्दाम हसणारा;
आलीस आणि माझ्या हातत तु बाहुली देऊन गेलीस...
मी दारावरच उभा एकटा...एकाकी...दूर,काही उत्तरांना शोधत.

No comments: